नाशिकहून लवकरच हैदराबाद, दिल्ली विमानसेवा | Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

spice Jet Airlines

नाशिकहून लवकरच हैदराबाद, दिल्ली विमानसेवा

नाशिक : कोरोनामुळे वर्षभरापासून बंद असलेली विमानसेवा पुन्हा सुरू व्हावी, यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. नाशिक- हैदराबाद आणि नाशिक- दिल्ली विमानसेवा आता अवघ्या काही दिवसातच पुन्हा सुरळीतपणे सुरू होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. (Nashik to Hyderabad and Nashik to Delhi Airline service will start in a few days in Nashik )

विमानसेवा स्पाइस जेट कंपनीकडून पुरवण्यात येत असून नाशिक- हैदराबाद आठवड्यातून सहा दिवस तर नाशिक- दिल्ली विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस उपलब्ध असणार आहे. नाशिक-हैदराबाद आणि नाशिक -दिल्ली विमानसेवा पुन्हा सुरू होणार असल्याने व्यापारी, उद्योजक उद्योजकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

केंद्र शासनाच्या उडान २ योजनेंतर्गत नाशिक शहर देशभरातील महत्त्वाच्या शहरांना हवाई मार्गाने जोडले जावे, या साठी खासदार हेमंत गोडसे यांनी पाच वर्षांपूर्वी प्रयत्न सुरू केले होते. या साठी खासदार गोडसे यांनी वेळोवेळी संसदेमध्ये आवाज उठवला होता. तत्कालीन मंत्री महोदय आणि नागरी वाहतूक प्रशासनाकडे गोडसे यांचा सतत पाठपुरावा सुरू होता.

हेही वाचा: विमान कंपन्यांना नाशिकचे पार्किंग; मेट्रो शहरांच्या तुलनेत कमी खर्चीक

विमानसेवेसाठी खासदार गोडसे यांनी दिल्लीत जाऊन नागरी हवाई मंत्रालयासमोर आंदोलनही केले होते. खासदार गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून तीन वर्षांपूर्वी नाशिक येथील ओझर विमानतळावरून प्रत्यक्ष विमानसेवेस प्रारंभ झाला होता. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील व्यापारी आणि उद्योजकांकडून या हवाई विमानसेवेला दोन वर्ष भरभरून प्रतिसाद मिळाला होता.परंतु कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे विमानसेवा बंद करण्यात आली होती.

स्पाइस जेट कंपनी प्रशासनाने आज (ता.२४) खासदार गोडसे यांना नाशिक- हैदराबाद आणि नाशिक- दिल्ली या दरम्यानच्या हवाई सेवेचे शेड्युलिंग पाठविले असून लवकरच विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती कळविली आहे. नाशिक -हैदराबाद विमानसेवा शनिवार वगळता रोजच तर नाशिक - दिल्ली विमानसेवा रोजच उपलब्ध असणार आहे. हैदराबाद - नाशिक हे विमान हैदराबाद येथून सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी निघणार असून तेच विमान पुन्हा सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी ओझर येथून हैदराबादसाठी उड्डाण घेणार आहे.

दिल्ली -नाशिक हे विमान सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी रोज दिल्ली येथून नाशिकसाठी उड्डाण घेणार असून तेच विमान नाशिकहून पुन्हा दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी दिल्लीसाठी टेक- अप होणार आहे. नाशिक- हैदराबाद या विमानात प्रवाशांची क्षमता ८० असणार असून हा प्रवास अवघ्या ९० मिनिटांचा राहणार आहे. नाशिक -दिल्ली विमानात विमानात १८९ प्रवाशांची आसन क्षमता असणार असून प्रवास दोन तासांचा असणार आहे.

हेही वाचा: 1000 प्रवाशांपर्यंत क्षमता वाढविता येणे शक्य; टर्मिनल विस्ताराला संधी

Web Title: Nashik To Hyderabad And Nashik To Delhi Airline Service Will Start In A Few Days Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top