Abha Golden Card: आयुष्मान भारत गोल्डन कार्ड वितरणात राज्यात नाशिक अव्वल

aayushmaan bharat golden card
aayushmaan bharat golden cardesakal

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

Abha Gold Card : सर्वसामान्यांना मोफत उपचार मिळावेत, यासाठी नागरिकांना आयुष्मान भारत गोल्डन कार्ड दिले जात आहे. १ सप्टेंबरपासून हे नवे गोल्डन कार्ड काढण्यास सुरवात झाली. हे कार्ड काढण्यात गत महिनाभरात नाशिक जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.

आतापर्यंत राज्यात एक कोटी २६ लाख ३४ हजार ३५५ नागरिकांचे कार्ड काढण्यात आले. यात सर्वाधिक नाशिक जिल्ह्यातील १० लाख ४८ हजार ६५५ नागरिकांचे कार्ड काढले गेले आहेत.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल जनतेला आरोग्याचे उपचार मोफत मिळावेत, यासाठी केंद्र सरकारकडून आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राबविली जाते. आयुष्मान भारत योजना ही भारत सरकारची आरोग्य योजना आहे. या योजनेंतर्गत सरकार लोकांना आयुष्मान भारत गोल्डन कार्डद्वारे पाच लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्यसेवांद्वारे मोफत उपचार दिले जातात. (Nashik top state in distribution of Ayushman Bharat Golden Card news)

योजनेत एक हजार २०९ शस्त्रक्रिया, चिकित्सा, उपचारांचा समावेश आहे. पूर्वी दिलेल्या कार्डवर महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा आयुष्मान भारत योजना असे एकच नाव येत होते. मात्र, आता या कार्डचे नियम बदलले असून, नव्याने दिल्या जाणाऱ्या कार्डवर दोन्ही योजनांची एकत्रित नावे येणार आहेत. त्यामुळे या दोन्ही योजनांचे उद्दिष्टही वाढून ३५ लाख करण्यात आले. हे कार्ड काढण्यासाठी आधारकार्ड, शिधापत्रिका, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र व रजिस्टर मोबाईल नंबर आदी कागदपत्रे लागतात.

मोफत उपचारांसाठी आवश्यक असणारे गोल्डन कार्ड काढण्यास राज्यासह जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून सुरवात झाली आहे. जिल्ह्यात या कार्डाचे २१ लाख दोन हजार ८०७ लाभार्थी आहेत. यापैकी १० लाख ४८ हजार ६५५ लाभार्थ्यांना कार्डाचे वितरण करण्यात झाले असल्याची माहिती आयुष्मान भारत योजनेचे डॉ. राजेंद्र बागूल यांनी दिली.

असे काढा गोल्डन कार्ड

गोल्डन कार्ड काढण्यासाठी पोर्टल तयार करण्यात आले आहे. त्याद्वारे लाभार्थी स्वतः कार्ड काढू शकतो, तसेच आशा सेविकांनाही कार्ड काढण्यासाठी लॉग इन आयडी देण्यात आले आहेत. सुरवातीला मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअरमधून ‘आयुष्मान’ अॅप डाउनलोड व इन्स्टॉल करा. त्यानंतर ‘आधार फेस आयडी’ इन्स्टॉल करा.

आयुष्मान अॅपमध्ये बेनेफिशियरी लॉगीन पर्यायाची निवड करा. मोबाईल ओटीपीच्या सहाय्याने लॉगीन करा, त्यानंतर ‘सर्च’ पर्यायात नाव, आधारकार्ड क्रमांक आणि शिधापत्रिका ऑनलाइन आयडीद्वारे योजनेत आपले नाव समाविष्ट आहे किंवा नाही, हे पाहता येते. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी आधारकार्डशी संलग्न किंवा फेस ऑथच्या माध्यमातून पूर्ण करता येते.

aayushmaan bharat golden card
ABHA Health ID: मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेल्या 'आभा हेल्थ कार्ड' बाबत माहितीये?

तालुकानिहाय कार्डचे झालेले वितरण

तालुका लक्ष्यांक वितरित झालेले कार्ड

पेठ ६९ हजार १४८ ६० हजार ७६६

नाशिक ७६ हजार २२१ ५२ हजार ९१२

सुरगाणा १ लाख ७ हजार ४८४ ७३ हजार ५०

कळवण ९० हजार ५९६ ५७ हजार ८६५

दिंडोरी १ लाख ६४ हजार १४९ ९८ हजार ९८७

देवळा ६६ हजार ३०७ ३७ हजार ३५५

चांदवड ९१ हजार २८० ४९ हजार ६५०

त्र्यंबकेश्वर ९७ हजार २४१ ५२ हजार ५५०

येवला ९९ हजार ८४२ ५२ हजार ५५०

इगतपुरी १ लाख ६ हजार ५५३ ५५ हजार ४०९

निफाड १ लाख ५९ हजार ६३६ ८० हजार १६३

नांदगाव १ लाख ३ हजार ८१३ ५१ हजार ७७

aayushmaan bharat golden card
ABHA Card News : आयुष्मान कार्ड वितरणात नाशिकचा भोपळा; मालेगाव अव्वल

बागलाण १ लाख ६७ हजार ६६२ ८१ हजार ८५५

सिन्नर १ लाख २३ हजार ३२४ ५५ हजार २८७

मालेगाव १ लाख ७४ हजार ८१० ६४ हजार ४४१

मालेगाव मनपा २ लाख ४२ हजार २१७ ९१ हजार ९३८

नाशिक मनपा १ लाख ६१ हजार ९६० ३२ हजार ६८१

"जिल्ह्यात आयुष्मान भारत गोल्डन कार्ड देण्याचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. कार्ड देण्याचा वेग वाढावा, यासाठी तालुकानिहाय समित्या करून त्याद्वारे या योजनेला गती देईन. हा प्रस्ताव प्रशासनाला सादर झाला आहे." - डॉ. राजेंद्र बागूल, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद

aayushmaan bharat golden card
Nashik News: जायकवाडी पाणी प्रकरणी उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com