Swachha Jal Abhiyan : स्वच्छ जल अभियानात नाशिक राज्यात अव्वल!

जिल्ह्यातील एक हजार ९११ गावांतील एक हजार ३९६ ग्रामपंचायतींना या किटचे वाटप करत तपासणी झाली आहे.
Nashik Swachha Jal Abhiyan
Nashik Swachha Jal Abhiyanesakal

Nashik News: गावातील पिण्याचे पाणी योग्य आहे की नाही, हे तपासण्यासाठी तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी प्रयोगशाळेत नमुने पाठविले जायचे.

आता पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व सहनियंत्रण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियानात गावस्तरावर जैविक आणि रासायनिक फीड टेस्ट किटच्या सहाय्याने ही तपासणी गावातच करण्यात आली.

जिल्ह्यातील एक हजार ९११ गावांतील एक हजार ३९६ ग्रामपंचायतींना या किटचे वाटप करत तपासणी झाली आहे. या अभियानात नाशिक जिल्हा ८८ टक्के काम पूर्ण करत राज्यात अव्वल ठरला आहे. (Nashik tops state in Swachha Jal Abhiyan nashik news)

जलजीवन मिशन कार्यक्रमात ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना २०२४ पर्यंत ‘हर घर नल से जल’ यानुसार प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे.

या कार्यक्रमांतर्गत पाणी गुणवत्ता सहनियंत्रण व सर्वेक्षण राबविण्यात येत आहे. यामध्ये गावस्तरावर रासायनिक फीड किटच्या सहाय्याने जलसुरक्षा व महसूल गावातील पाण्याच्या स्त्रोतची तपासणीसाठी ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियान राबविले गेले.

या अभियानात निवडण्यात आलेल्या पाच महिलांद्वारे पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्याकरिता नाशिक जिल्हयातील एक हजार ९११ गावामधील एक हजार ३८६ ग्रामपंचायतींना फिड टेस्ट किट पुरविले होते.

तसेच सहा प्रयोगशाळांना सहा कीट दिले होते. जैविक तपासणीला प्रत्येक स्त्रोतांसाठी दोन बाटल्या दिल्या होत्या. जैविकमध्ये ९६.१३ टक्के तर, रासायनिकमध्ये ९९.४२ टक्के काम झाले आहे.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

Nashik Swachha Jal Abhiyan
नारोशंकराची घंटा : तेल गेले अन तूपही गेले...

पाणी गुणवत्ता सहनियंत्रण सर्वेक्षण कार्यक्रम रासायनिक फीड टेस्ट किटची गावपातळीवर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर प्रशिक्षकांचे प्रशिक्षण दिलेले आहे. त्या अनुषंगाने त्यांनी तालुकास्तरावरील सर्व जलसुरक्षक व गावनिहाय पाच महिला प्रतिनिधींनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे.

प्रशिक्षण घेतलेल्या जलसुरक्षक व पाच महिलांनी गावनिहाय शाळा, अंगणवाडी, कुटुंबस्तरीय वितरण बिंदूपासून पाण्याची तपासणी करून त्याची नोंद केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर करतात.

अशी होते फिड कीट टेस्टद्वारे तपासणी

पिण्याच्या पाण्याचे निश्चित केलेल्या स्त्रोतची प्राप्त झालेल्या फिड कीट टेस्टद्वारे तपासणी केली जाते. ही तपासणी जैविक आणि रासायनिक या दोन प्रकारांत करण्यात येते. जैविक पद्धतीत पाण्याचा नमुना घेत प्रयोगशाळेत पाठविला जातो.

प्रयोगशाळेतील तपासणीत सदर पाण्याचा रंग काळा झाल्यास पाणी पिण्यास अयोग्य ठरविले जाते. ते पाणी पिण्याजोगे करण्यासाठी टीसीएल पावडरचा पुरवठा केला जातो तसेच पर्यायी स्त्रोताचा शोध घेतला जातो.

रासायनिक पध्दतीतील ११ घटकद्वारे (पी. एच, गढूळपणा, एकूण हार्डनेस, कॅल्शीयम, मॅग्नेशियम, क्लोराईड, एकूण आल्कलिनीटी, क्लोरीन अवशेष, लोह, नाईट्रेट, फ्लोराऊड) तपासण्या केल्या जातात.

त्यामुळे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तसेच त्यामध्ये प्रमाणित असणारे रासायनिक घटक हे पिण्यास योग्य प्रमाणात आहेत अथवा नाहीत, हे रासायनिक फीड टेस्ट किटद्वारे कळण्यास मदत होते.

Nashik Swachha Jal Abhiyan
नारोशंकराची घंटा : `भाऊ तुम्ही माझी चप्पल घातली!’

राज्यात नाशिक अव्वल

या अभियानात जिओ टॅंगिक करणे (हे काम ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत येते) रासायिनक आणि जैविक पद्धतीने केलेल्या पाणी नमुने तपासणी यांची नोंद (सदर काम पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग करते) केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर करावी लागते. या नोदींच्या आधारे राज्यात नाशिक जिल्हा प्रथम क्रमांकावर (८७.३८ टक्के) असून, सिंधुदुर्ग जिल्हा (८३.९५ टक्के) दुसऱ्या तर, धुळे जिल्हा (७४.६१ टक्के) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

तपासणीचे तालुकानिहाय झालेले काम

तालुका रासायनिक जैविक

  • बागलाण ९९.१० टक्के ९८.२० टक्के

  • चांदवड ९७.३० टक्के ९४.५९ टक्के

  • देवळा १०० टक्के ७९.५९ टक्के

  • दिंडोरी १०० टक्के ९१.६७ टक्के

  • इगतपुरी ९९.१५ टक्के ९९.१५ टक्के

  • कळवण १०० टक्के ८६.७५ टक्के

  • मालेगाव ९७.८९ टक्के ९४.३७ टक्के

  • नांदगाव १०० टक्के १०० टक्के

  • नाशिक १०० टक्के १०० टक्के

  • निफाड १०० टक्के ९८.४८ टक्के

  • पेठ १०० टक्के ९९.३१ टक्के

  • सिन्नर ९८.४४ टक्के ९६.८८ टक्के

  • सुरगाणा १०० टक्के १०० टक्के

  • त्र्यंबकेश्वर ९९.१९ टक्के ९५.१६ टक्के

  • येवला १०० टक्के १०० टक्केपान-१

Nashik Swachha Jal Abhiyan
Tilvan festival : सासू- सुनेच्या नात्‍याची घट्ट गुंफण; सासू करतात सुनेचे अनोखे स्वागत!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com