

नाशिक : सलग सुट्या, शनिवार रविवारचे औचित्य साधत भल्या पहाटेपासून गोदाघाटावर पर्यटक भाविकांच्या बसेसचे मोठ्या प्रमाणावर आगमन झाले. मोठ्या संख्येने वाहने आल्याने म्हसोबा पटांगणावरील वाहनतळही ‘हाऊसफुल’ झाले होते. शहराने अलीकडे औद्योगिक नगरी अशी ओळख मिळविलेली असली तरी नाशिकची प्राचीन ओळख धार्मिक शहर अशीच राहिली आहे. येथील श्री काळाराम मंदिर, रामतीर्थ, कपालेश्वर, तपोवन, सोमेश्वरसह बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरची पर्यटक भाविकांना नेहमीच भुरळ पडते.