Dhol Pathak
sakal
नाशिक: नाशिक, पुणे, मुंबईतील ढोलपथक जगभर प्रसिद्ध असले तरी नाशिक शहर अर्थकारणाच्या दृष्टीने दोन्ही शहरांच्या तुलनेने मागेच पडते. शहरात एकूण ३०, तर जिल्ह्यात ४५ पारंपरिक ढोलपथक आहेत. गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने निघणाऱ्या मिरवणुकीतून तीन-चार पथकांमधून सुमारे अडीच ते तीन लाख रुपयांची उलाढाल शहरात होत असल्याने अनेकदा छंद म्हणून वादन करणाऱ्या पथकांना कर्ज काढून उत्सव साजरा करण्याची वेळ येते.