Nashik Accident News : वाहतूक ब्लॅक स्पॉटवरील अपघात मुक्ती कागदावरच

Nashik News : छत्रपती संभाजी नगर महामार्गावर दीड वर्षापूर्वी झालेल्या अपघातानंतर तातडीने ब्लॅक स्पॉट मुक्त करण्याच्या सूचना देऊनही अद्याप ब्लॅक स्पॉट मुक्ती कागदावरच आहे.
Accident News
Accident Newsesakal

Nashik News : छत्रपती संभाजी नगर महामार्गावर दीड वर्षापूर्वी झालेल्या अपघातानंतर तातडीने ब्लॅक स्पॉट मुक्त करण्याच्या सूचना देऊनही अद्याप ब्लॅक स्पॉट मुक्ती कागदावरच आहे. आता निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर ब्लॅक स्पॉटमुक्त केले जातील, अशी भूमिका महापालिकेने घेतली असली तरी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहितेचा कालावधी लांबला आहे.

ऑक्टोबर २०२२ मध्ये छत्रपती संभाजीनगर महामार्गावर महापालिका हद्दीत मोठा अपघात झाला. यात बारा प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेची पाहणी करून अपघातांच्या ब्लॅक स्पॉट वरील अतिक्रमणे तातडीने हटविण्याबरोबरच येथे उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

वाहतूक समितीने शहरात सर्वेक्षण करून २६ ब्लॅक स्पॉट असल्याचा अहवाल सादर केला होता. ब्लॅक स्पॉट अपघात मुक्त करण्यासाठी नगररचना विभागाकडून रेखांकन करण्यास विलंब झाला होता. (latest marathi news)

Accident News
Gadchiroli Accident : बस उलटून वाहकासह दोन महिला प्रवासी गंभीर

त्यानंतर अतिक्रमण निर्मूलन विभागाने देखील टाळाटाळ केली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर मागील दोन महिन्यांपासून कारवाई थंड बस्त्यात आहे.

दरम्यान आता आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर कारवाई केली जाणार असल्याचा दावा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून करण्यात आला आहे.

Accident News
Kalyani Nagar Accident : चालकाला धमकावणे भोवले;अल्पवयीन आजोबांसह वडिलांवर गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com