
पंचवटी : नाशिक शहर सुंदर दिसावे, याकरिता ठिकठिकाणी वाहतूक बेटे उभारली जातात. मात्र, सुशोभीकरणाला पंचवटी विभागात अस्वच्छता व दुरवस्थेचे ग्रहण लागले आहे. वाहतूक बेटांना बकाल स्वरूप प्राप्त झाले असून ओंगळवाणे चित्र दिसून येत आहे. नाशिक शहराचे हृदय म्हणजे पंचवटी असेदेखील संबोधले जाते. पंचवटी विभागात जवळपास सहा ते सात ठिकाणी वाहतूक बेट आहेत. मात्र, आजरोजी त्यांची दुरवस्था झाली आहे.