Nashik Traffic
sakal
नाशिक: नाताळ सणानिमित्त शाळा- महाविद्यालयांना आलेल्या सलग सुट्यांमुळे रस्त्यांवर रहदारी वाढली आहे. पुण्या- मुंबईसाठी सहा ते सात तासांचा वेळ लागत असल्याने प्रवासातच प्रवाशांची दमछाक होत असल्याची स्थिती होती. रविवारी (ता. २८) रात्री उशिरापर्यंत वाहतूक मंदावलेली होती. दरम्यान, चोहोबाजूंच्या रस्त्यांवरून शहराबाहेर पडताना तब्बल अर्धा ते पाऊण तासाचा वेळ लागत होता.