Nashik Traffic Problem : होळकर पुलावर टोइंग कधी? अघोषित पार्किंगने वाहतूक कोंडीत भर

Nashik : शहरातील अनधिकृत पार्किंगमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते.
Unannounced parking at Holkar bridge
Unannounced parking at Holkar bridgeesakal

Nashik Traffic Problem : शहरातील अनधिकृत पार्किंगमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. गोदावरी नदीवरील होळकर पुलावरच चारचाकी वाहनांची अघोषित पार्किंग व हातगाडीवर फळ विक्रेतेदेखील दिसून येत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत वाढ होत असून यावर वाहतूक पोलिस व मनपा अतिक्रमण विभागाने संयुक्त कारवाई मागणी जोर धरू लागली. तसेच या अघोषित पार्किंगवर टोइंग कारवाई होणार का, याकडेदेखील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (traffic jam due to Unannounced parking on Holkar bridge)

रविवार कारंजाकडून पंचवटीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील होळकर पुलावर अनधिकृतरीत्या चारचाकी वाहनांचे पार्किंग केले जात आहे. यामुळे रविवार कारंजा येथील वाहतूक कोंडीवर अधिकचीच भर पडते आहे. रविवार कारंजा येथे वाहनांच्या रहदारीमुळे आधीच वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. त्यात होळकर पुलावरील पार्किंगची भर पडली आहे.

गोदावरी नदीवर नवीन होळकर पुलावरील पादचारी रस्त्याच्या बाजूला एका रांगेत चारचाकी वाहने पार्क केल्या जात असून दिवसभर पादचारी मार्ग अडवून हातगाडीवाले व्यवसाय थाटत असल्याचे चित्र आहे. यामुळे पुलावरील रस्त्यांची रुंदी कमी होऊन वाहतुकीला ही वाहने अडथळा ठरत आहेत. (latest marathi news)

Unannounced parking at Holkar bridge
Nashik News : गांधीगिरी करत महिलांनी बंद पाडला बिअर बार

जर एखादी सिटी बस या मार्गाने जात असेल तर या पार्क केलेल्या वाहनांमुळे बसच्या बाजूने जागा काढत दुचाकीने सुद्धा पुढे निघत नाही. या प्रकारामुळे रविवार कारंजाकडून पंचवटी कारंजाकडे येणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा होऊन यामुळे परिणाम रविवारी कारंजावर वाहतूक कोंडीत होतो आहे. शहर बसला अडथळा झाल्यास सारी वाहतूक खोळंबून पुलाच्या दुतर्फा लांबच लांब वाहनांच्या रांगा लागून राहतात.

विशिष्ट ठिकाणी कारवाई

नाशिक शहरात पार्किंगची मोठी समस्या दिवसागणिक वाढत चाललेली आहे. यावर उपचार म्हणून १ मेपासून पुन्हा कारवाई शहरात सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई काही विशिष्ट ठिकाणी होते, अशी अनेकांची ओरड आहे. या टोइंग कारवाई रविवार कारंजा, अहिल्याबाई होळकर पुलावर देखील कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Unannounced parking at Holkar bridge
Nashik News : भीक मागणाऱ्या मुलांची संख्या वाढल्याने अपघातांत वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com