Nashik Traffic Problem : मनमाडला 7 तास वाहतूक ठप्प! ट्रकमध्ये बिघाड झाल्याने खोळंबा; प्रवाशांचे हाल

Traffic Problem : इंदूर-पुणे राज्य महामार्गावर रेल्वे पुलावर सकाळी सातच्या सुमारास मालवाहतूक ट्रक बिघडल्याने सुमारे सात तास वाहतूक विस्कळीत झाली होती.
A broken down truck on the Indore-Pune highway
A broken down truck on the Indore-Pune highwayesakal
Updated on

Nashik Traffic Problem : इंदूर-पुणे राज्य महामार्गावर रेल्वे पुलावर सकाळी सातच्या सुमारास मालवाहतूक ट्रक बिघडल्याने सुमारे सात तास वाहतूक विस्कळीत झाली होती. क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला घेतल्यानंतर दुपारी एकनंतर वाहतूक सुरळीत झाली. रस्त्याच्या मधोमध ट्रक नादुरुस्त झाल्याने सकाळपासून वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीत अडकून पडल्यामुळे चाकरमानी, नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी, बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. (Traffic jammed for 7 hours to Manmad plight of passengers )

रेल्वे ओलांडणारा हा एकमेव पूल असल्यामुळे वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे पर्यायी मार्गाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. इंदूर ते पुणे हा राष्ट्रीय महामार्ग मनमाड शहरातून गेला आहे. तर याच मार्गाला मुंबई, नाशिक, चांदवड तसेच धुळे, मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगर, चाळीसगाव, जळगाव, नांदगावमार्गे मालेगाव चौफुली येथे येऊन मिळतो. या महामार्गावर शहराच्या मधोमध रेल्वे मार्ग गेल्यामुळे रेल्वे ओलांडण्यासाठी रेल्वे पूल आहे.

त्यामुळे या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने दळणवळणाच्या दृष्टीने हा मार्ग अत्यंत महत्वाचा आहे. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास या मार्गावरील पुलावर माल वाहतूक ट्रकमध्ये (क्र. आरजे-१४ -जीजी-९१६४) बिघाड झाल्यामुळे तो रस्त्याच्या मधोमध उभा करण्यात आला. या अडथळ्यांमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. गाड्या जाण्या-येण्यास जागाच नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

या वाहतूक कोंडीचा फटका मनमाड-चांदवड, मनमाड-मालेगाव, मनमाड-नांदगाव मार्गाला बसला. या मार्गावरही लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. सदर मार्गावर सुमारे पाच अनकवाडे गावापर्यंत रांगा लागल्या होत्या. सकाळी हा प्रकार घडल्यामुळे नोकरीवर जाण्यासाठी, कामानिमित्त जाणारे, बाहेरगावी जाणारे, शाळा, कॉलेज, शिक्षणासाठी बाहेरगावी जाणारे चाकरमानी, नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी, बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. (latest marathi news)

A broken down truck on the Indore-Pune highway
Nashik Traffic Problem: अनधिकृत थांब्यांनी चौकांचा कोंडला श्वास! वाहतूक कोंडी नित्याची; वाहतूक पोलिसांकडून होईना कारवाई

पोलिसांची दमछाक

अनेकांना आजच्या दिवसाची सक्तीची रजा घ्यावी लागली. तर शाळा-कॉलेजला दांडी मारावी लागली. अनेक प्रवाशांचे खाण्या-पिण्याचे हाल झाले. रुग्णांनाही या वाहतूक कोंडीचा फटका बसला. या प्रकारामुळे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. क्रेन आणून ती बिघडलेल्या ट्रकजवळ नेऊन सदर ट्रक रस्त्याच्या कडेला घेतल्यानंतर हळूहळू वाहने पुढे सरकू लागली. वाहने निघू लागल्याने वाहतूक कोंडी कमी होऊ लागली. सुमारे सात तास वाहतूक कोंडीत अडकून पडण्याची वेळ प्रवाशांवर आली होती.

पर्यायी मार्गाची मागणी

गेल्या आठ महिन्यांपूर्वी सदर रेल्वेच्या पुलाचा कठडा तुटल्यामुळे सुमारे अडिच महिने वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यावेळी पर्यायी मार्ग नसल्याने राज्यातील वाहतूक प्रवाशांसह मनमाडकर, परिसरातील शहर, गावांतील नागरीकांना मन:स्ताप सहन करावा लागला होता. आजही त्याच प्रसंगाची आठवण झाली. सुमारे सात तास वाहतूक बंद असल्याने गाड्या ये-जा करण्यास दुसरा मार्गच नव्हता.

त्यामुळे जागच्या जागी वाहने थांबल्याने पाच किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. रेल्वे ओलांडणारा हा एकमेव पूल आणि मार्ग असल्याने अनेकदा वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे मोठी घटना घडल्यास पुन्हा असा प्रकार होऊ नये यासाठी एकदा पर्यायी मार्गाची व्यवस्था शासनाने करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

A broken down truck on the Indore-Pune highway
Nashik Traffic Problem : वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पोलिसांचा कारवाईचा दंडुका! बेशिस्त वाहनचालकांना ई-मशिनचा चाप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.