Nashik Traffic Problem : मखमलाबाद नाक्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच; शहर वाहतूक शाखेचे दुर्लक्ष

Traffic Problem : शहरातील अशोकस्तंभाकडून आलेल्या वाहनधारकांना पेठ व दिंडोरी रोडकडे जाण्यासाठी महत्त्वाचा व जुना मार्ग असलेल्या मखमलाबाद नाक्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.
Traffic jam at Makhmalabad port.
Traffic jam at Makhmalabad port.esakal

Nashik Traffic Problem : शहरातील अशोकस्तंभाकडून आलेल्या वाहनधारकांना पेठ व दिंडोरी रोडकडे जाण्यासाठी महत्त्वाचा व जुना मार्ग असलेल्या मखमलाबाद नाक्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. एकीकडे कोठारवाडीपर्यंत, तर दुसऱ्या बाजूला पेठकर प्लाझापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. यामुळे इंधनासोबतच वेळेचाही अपव्यय होतो. शहर वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. (Nashik Traffic jams are common at Makhmalabad port marathi news)

दिंडोरी रोड व पेठ रोडकडून आलेले बहुसंख्य वाहनधारक अशोकस्तंभ, सीबीएस, जिल्हाधिकारी कार्यालय, गंगापूर रोड भागात जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. मधुबन कॉलनी, राजपाल कॉलनी, क्रांतीनगर व हनुमानवाडी परिसरात जाण्यासाठी वाहनधारकांना हाच चौक ओलांडून जावे लागते. त्यामुळे दिवसभर याठिकाणी वर्दळ असते. काही वर्षांपूर्वी स्थानिकांनी मागणी केल्यावर या चौकात सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली होती.

वाहतूक पोलिसही नियुक्त केला होता. दुर्दैवाने सिग्नल यंत्रणा नव्याचे नऊ दिवस सुरू राहिली आणि नंतर बंद पडली. त्यानंतर सिग्नल सुरूच झाले नाहीत. या बंद सिग्नलमुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला असून, वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप होत आहे. मखमलाबाद नाक्याकडून मधुबन कॉलनीत जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेकडून मार्किंग केले होते. (latest marathi news)

Traffic jam at Makhmalabad port.
Nashik Traffic Problem : शहराच्या मध्यवर्ती भागात अवजड वाहने; वाहतूक पोलिसांकडून सोईस्कररीत्या दुर्लक्ष

या ठिकाणी बऱ्याचदा वाहतूक पोलिस हे वाहतूक कोंडी सोडविताना दिसत असतात. मात्र काही वेळा त कोपऱ्याला उभे मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असतात. सिग्नल यंत्रणा असली तरी ती कधी चालू तर कधी बंद असते. सिग्नल चालू असताना वाहनचालक नियम पाळत नसल्याचे दिसते.या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांचे पार्किंग केले जाते. रस्ता अरुंद असल्याने अनधिकृत वाहनांचे पार्किंग, तसेच मखमलाबाद नाक्यावर असलेल्या व्यावसायिक इमारतीतील व्यावसायिकांच्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते.

रुग्णवाहिका अडकली

नाशिक शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत चालली आहे. मंगळवारी (ता. २३) साडेबारा ते एकच्या दरम्यान वाहतूक कोंडी झाली. चारही बाजूंनी वाहने अडकून पडली, यातच एक रुग्णवाहिका अडकून पडली अन् विशेष म्हणजे या वेळी या ठिकाणी वाहतूक पोलिसदेखील नव्हता. यामुळे रुग्णवाहिका बराच वेळ अडकून पडली होती. तरी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी पूर्ण वेळ वाहतूक पोलिस नेमावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे

Traffic jam at Makhmalabad port.
Nashik Traffic Problem : मेनरोडवर तोबा गर्दी! वाहतूक कोंडी; दुचाक्या, रिक्षांची गर्दीमध्ये भर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com