Nashik Traffic Problem : शहराच्या मध्यवर्ती भागात अवजड वाहने; वाहतूक पोलिसांकडून सोईस्कररीत्या दुर्लक्ष

Heavy vehicles in the central part of the city.
Heavy vehicles in the central part of the city. esakal

Nashik Traffic Problem : शहरात अवजड वाहनांना ठराविक वेळेतच (Nashik News) प्रवेश करण्याची परवानगी असताना, अलीकडे रहदारीच्या रस्त्यावरून अवजड वाहने धावत असतानाचे चित्र पहावयास मिळते आहे. (Heavy vehicles in central part of city are conveniently ignored by traffic police nashik news)

यामुळे अनेकदा वाहतूक कोंडीच्या समस्येसह अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही. शहराच्या मध्यवर्ती भागात अवजड वाहने येत असून, याकडे वाहतूक पोलिसांकडून सोईस्कररीत्या दुर्लक्ष केले जात आहे.

शहरातून मुंबई- आग्रा महामार्ग, नाशिक- पुणे महामार्ग, नाशिक - औरंगाबाद महामार्ग याशिवाय दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्‍वर हे मार्ग मार्गस्थ होतात. त्याचप्रमाणे शहरात नव्याने गृहप्रकल्पांचे कामे सुरू आहेत. स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे, खोदकामे, गॅस पाईपलाईनसाठी कामे सुरू आहेत.

तसेच, शहराच्या मध्यवर्ती भागात बाजारपेठ असल्याने या बाजारपेठेतील व्यावसायिकांचा माल घेऊन मालवाहू ट्रक येतात. अशी सारी एक ना अनेक कामे शहरात असल्याने गेल्या काही दिवसांपासून शहरात मालवाहू अवजड वाहने येऊ लागली आहेत. या अवजड वाहनांमुळे गंभीर अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Heavy vehicles in the central part of the city.
Nashik Engineering Cluster : नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरला लवादाचा दणका

त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात अवजड वाहनांना सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत प्रवेशबंदी वाहतूक शाखेकडून अधिसूचना काढून करण्यात आलेली आहे. तर औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या अवजड वाहनांनी रिंग रोडचा वापर करावा, अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत. असे असताना मालवाहू ट्रक, कंटेनर अशी अवजड वाहने शहराच्या मध्यवर्ती रस्त्यांचा, रहदारीच्या रस्त्याचा वापर करीत आहेत.

याकडे वाहतूक पोलिसांचे सोईस्कर दुर्लक्ष होत असल्याने पुन्हा भीषण अपघाताची घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहतूक शाखेने रिंग रोड वगळता शहरातील उपनगरी रस्त्यावरून धावणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई करण्याची मागणी जागरूक नागरिकांकडून होते आहे.

खडी-वाळूचे डंपर

शहरात अनेक भागांमध्ये नवीन इमारतींचे बांधकामे सुरू आहेत. त्यासाठी खडी, वाळू, स्टील घेऊन मालवाहू डंपर, ट्रक येतात. उपनगरी रस्ते अरुंद असतात. या अरुंद रस्त्यावर दिवसा रहदारी अधिक असते. त्यामुळे अशा वाहनांना रात्रीच्या वेळी वापर करण्यास परवानगी असताना, अलीकडे ही वाहने भरदिवसा शहरात जा-ये करताना दिसत आहेत.

काही वर्षांपूर्वी भल्या पहाटे भरधाव वेगातील डंपरखाली सापडून शाळकरी दोन मुले ठार झाल्याची घटना घडली होती. तर काही महिन्यांपूर्वी सिटी सेंटर मॉलसमोर ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांना दिवसा शहरात प्रवेश बंदी करण्याची मागणी होते आहे.

Heavy vehicles in the central part of the city.
Nashik News : आत्महत्येचे सत्र सुरुच... वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांनी घेतला गळफास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com