
पंचवटी : सन २०१५ च्या सिंहस्थ कुंभमेळामध्ये झालेला शहरातील रिंग रोड तब्बल दहा वर्षानंतरही अद्याप पूर्ण होऊ शकलेला नाही. निधीअभावी या रिंग रोडचे काम रखडले असून, अवघ्या दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तरी रिंग रोड पूर्णत्वास येईल, अशी अपेक्षा नाशिककरांना लागली आहे. सद्य:स्थितीत नाशिक शहराची स्मार्ट सिटी कडे वाटचाल सुरू आहे.