नाशिक- कुठल्याही शहरात वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी करायची असेल तर त्यासाठी वाहतूक धोरण असावे लागते. मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्ये वाहतुकीचे वाढते प्रश्न लक्षात घेऊन वाहतूक धोरण आखले आहे. परंतु, नाशिक महापालिकेला उशिराने जाग आली असून आयटीडीपी संस्थेच्या माध्यमातून धोरण आखण्यास सुरुवात झाली आहे. वाहतूक धोरणाला मंजुरी मिळाल्यानंतर शहरात सर्वंकष वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी करण्याबरोबरच केंद्र व राज्य शासनाचे प्रकल्प शहरात येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.