Assistant Commissioner of Police Transfers : राज्यातील 68 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या

Nashik News : महाराष्ट्र पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच असून, ६८ उपविभागीय तथा सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने जारी केले आहेत.
Nashik Police Transfers
Nashik Police Transfersesakal
Updated on

Nashik News : महाराष्ट्र पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरूच असून, ६८ उपविभागीय तथा सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने जारी केले आहेत. यात नाशिक शहर आयुक्तालयातील दोन सहाय्यक आयुक्त, तर ग्रामीणमधील एका उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. नाशिकमध्ये तीन महिला सहाय्यक आयुक्त रुजू होणार आहेत. (Transfers of 68 Assistant Commissioner of Police in state)

शासनाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांनी महाराष्ट्र पोलिस दलातील उपविभागीय तथा सहाय्यक आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. गेल्या आठवड्यात राज्यातील ३७९ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आज ६८ सहाय्यक पोलिस आयुक्त तथा पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.

या बदल्यांमध्ये नाशिक पोलिस आयुक्तालयातील सहाय्यक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांची अमरावती ग्रामीणमध्ये अंजनगाव उपविभागीय अधिकारी, तर मुख्यालयाचे सहाय्यक आयुक्त अंबादास भुसारे यांची हिंगोली येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली आहे.

तसेच नाशिक ग्रामीण दलातील पेठच्या उपविभागीय अधिकारी कविता फडतरे यांची नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये बदली करण्यात आली आहे. याशिवाय, लातूर ग्रामीणचे उपविभागीय अधिकारी यांची नाशिकच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीत. (latest marathi news)

Nashik Police Transfers
Nashik News : जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करा!

मुंबई नागरी हक्क संरक्षणचे उपअधीक्षक सुनील घुगे व अमरावती ग्रामीणचे दर्यापूरचे उपअधीक्षक गुरुनाथ नायडू यांची नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकादमीत, संजय बांबळे यांची नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकादमीतून साक्री (धुळे) उपविभागीय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलिस आयुक्तालयात मीरा-भाईंदर-वसई-विरार येथील सहाय्यक पोलिस आयुक्त पद्‌मजा बढे, सोलापूर पोलिस प्रशिक्षण केंद्रातील उपअधीक्षक अनुराधा उदमले आणि नाशिक महाराष्ट्र पोलिस अकादमीतील उपअधीक्षक संगीता निकम यांची नाशिक शहर पोलिस आयुक्तालयात नियुक्ती करण्यात आली आहे.

Nashik Police Transfers
Nashik ZP News : जि. प. कर्मचारी बँकेची रविवारी वार्षिक सभा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.