Nashik ZP News : जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांचा कायापालट; जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून 50 रुग्णालयांसाठी 2 कोटींची तरतूद

Nashik News : जिल्हा परिषदेच्या नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हाभरातील ५० पशुवैद्यकीय दवाखाने विकसित केले जाणार असून, त्यासाठी सेस अंतर्गत दोन कोटींची तरतूद करण्यात आली.
Nashik ZP News
Nashik ZP Newsesakal

Nashik News : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यापाठोपाठ आता पशुवैद्यकीय दवाखाने आदर्श होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हाभरातील ५० पशुवैद्यकीय दवाखाने विकसित केले जाणार असून, त्यासाठी सेस अंतर्गत दोन कोटींची तरतूद करण्यात आली. (Transformation of veterinary clinics in district with excess funds of Zilla Parishad)

यात प्रामुख्याने दवाखान्यांत पायाभूत सुविधा उपलब्ध करून दवाखान्यांच्या भिंती बोलक्या केल्या जाणार आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत प्राथमिक शाळा मॉडेल स्कूल करण्यात येत आहेत. यात पहिल्या टप्यात १२८ शाळा मॉडेल स्कूल करण्यात आल्या; तर दुसऱ्या टप्प्यात ५२१ शाळा या मॉडेल स्कूल होत आहेत.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट (आदर्श) करण्यात येत असून, ४० प्राथमिक आरोग्य केंद्रे आदर्श केली जातील. या उपक्रमानंतर पशुवैद्यकीय दवाखाने विकसित करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सरसावले आहे. नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत दवाखान्यांमध्ये पायाभूत सुविधा दिल्या जातील. यात दवाखान्यात जनावरांना पिण्याच्या पाण्याचा हौद, परिसरात वृक्षारोपण करणे.

जनावरांना आवश्यक आणि उपयुक्त असे विविध चारा पिकांचे वाण यांचा प्रचार व प्रसार होण्यासाठी उपलब्ध जागेत व्यवस्थित कुंपण व पाण्याची व्यवस्था करून विविध सुधारित चारा पिके आणि ठोंबे यांची जोपासना करणे, पशुवैद्यकीय दवाखान्याच्या भिंतीवर शासनाच्या विविध योजना, पशुसंवर्धनविषयक महत्त्वाचे रोग व त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक उपाय, उपचार, जनावरांना लागणारा सकस आहार. (latest marathi news)

Nashik ZP News
Nashik Parking Problem : ‘नो-पार्किंग’मधील वाहनांकडे ‘कानाडोळा’! सोयीनुसार वाहनांची टोईंग; कोंडीची समस्या जैसे थे

दुग्ध उत्पादन वाढीसाठी लागणारी आवश्यक माहिती, चित्रे, छायाचित्रे, भित्तिपत्रे याद्वारे जनजागृती करीत भिंती बोलक्या केल्या जातील. याशिवाय, फर्निचर, प्रयोगशाळा, दवाखान्यात संगणक देऊन त्यात विविध माहितीचे संकलन करणे, परिसरात हौद तयार करणे आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी सेस अंतर्गत दोन कोटींचा निधी देण्यात येईल. यासाठी पशुसंवर्धन विभागाने तालुक्यातून दवाखान्यांचे प्रस्ताव मागविले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली.

दुरुस्तीला निधी मिळेना

जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांची दुरुस्ती करण्यासाठी निधी मिळत नव्हता. सदस्य, पदाधिकारी सभागृहात असताना या विषयावर तासनतास चर्चा होत असे. सदस्य दुरुस्तीसाठी निधीची मागणी करीत. मात्र, निधी नसल्याने दुरुस्त्या होत नव्हत्या. मात्र, आता नावीन्यपूर्ण योजनेतून दवाखाने विकसित करण्यासाठी निधी मिळत आहे. यातून सुसज्ज दवाखाने उभे राहतील.

Nashik ZP News
Nashik Lok Sabha Police Alert : सोशल मीडियावर सायबर पोलिसांचा ‘वॉच’! सायबरची स्वतंत्र टीम 24X7 दक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com