Nashik NMC News : महापालिकेच्या रुग्णालयात उपचारांकडे कल! वर्षभरात 10 लाख उपचार, 4 हजार शस्रक्रिया

Nashik News : एकीकडे सरकारी रुग्णालयांवरचा विश्‍वास कमी होत असताना २२ लाख लोकसंख्येच्या नाशिक शहरात मात्र महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
NMC News
NMC Newsesakal

Nashik NMC News : एकीकडे सरकारी रुग्णालयांवरचा विश्‍वास कमी होत असताना २२ लाख लोकसंख्येच्या नाशिक शहरात मात्र महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. वर्षभरात महापालिकेच्या पाच रुग्णालयांसह आरोग्य केंद्रांमध्ये ९ लाख ५२ हजार ६२९ रुग्णांवर उपचार करण्यात आले. यात ७०९३ महिलांच्या प्रसूती, तर ३८०६ रुग्णांची शस्रक्रिया करण्यात आली. (Nashik Trend towards NMC hospital 10 lakh treatments 4 thousand surgeries in year)

शहरात महापालिकेचे पाच मोठे रुग्णालय व तीस प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. नाशिक रोड विभागात महापालिकेचे स्व. बाळासाहेब ठाकरे रुग्णालय उत्तर महाराष्ट्रात सर्वात मोठे आहे. त्या व्यतिरिक्त कठडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, पंचवटी विभागातील इंदिरा गांधी रुग्णालय, मोरवाडी येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालय, पंचवटीतील मायको दवाखाना ही मोठी रुग्णालये आहेत.

त्या व्यतिरिक्त तीस शहरी आरोग्य केंद्रे, ४७ आरोग्यवर्धिनी केंद्रांमार्फत रुग्ण सेवा दिली जाते. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये एमआरआय व सीटी स्कॅन, सोनोग्राफी, नवजात शिशू उपचार कक्ष, अतिदक्षता विभाग, रक्तपेढी या सेवा दिल्या जातात. रुग्णसेवेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतले जात असल्याचे वैद्यकीय विभागाच्या वार्षिक अहवालातून स्पष्ट झाले.  (latest marathi news)

NMC News
Nashik NMC News : जीपीओ जलकुंभ आवारातील CCTV ठरले शोभेच्या वास्तू!

ग्रामिण रुग्णांवर उपचार

महापालिकेच्या रुग्णालये तसेच आरोग्य केंद्रांमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांमध्ये ग्रामिण भागातील रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. नाशिकरोडच्या स्व. बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात भगूर, विंचुरी, दोनवाडे, राहुरी, शिंदे व पळसे तसेच सिन्नर भागातील रुग्ण उपचारासाठी येत असून त्यामुळे रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून येते. उपचारासाठी आलेल्या रुग्णाला उपचार देणे बंधनकारक आहे. ग्रामिण, शहरी असा भेद करता येत नाही.

महापालिकेच्या रुग्णालयांमधील रुग्णसेवा (मार्च २०२४ पर्यंत)

- बाह्यरुग्ण- ९,५२,६२९

- आंतररुग्ण- ३३,९३२

- प्रसूती- ७०९३

- मलेरिया- १,१५,९१८

- शस्त्रक्रिया- ३८६०

- तपासलेले रक्तनमुने- २,८७,११३

- तपासलेले लघवी नमुने- १,०८,५०७

NMC News
NMC News : निच्चांकी मतदानाच्या केंद्रांवर महापालिकेचे वर्कआऊट; टक्का वाढविण्यासाठी उपाययोजना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com