नाशिक: आश्रमशाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असताना आदिवासी विकास विभागाने या गडबडीत नियुक्त केलेल्या खासगी संस्थांचा गलथान कारभार उघडकीस आला आहे. पेण प्रकल्पातील माध्यमिकच्या एका इंग्रजी विषयाच्या शिक्षकाला थेट प्राथमिक विभागात मराठी विषयासाठी नियुक्तिपत्र पाठविले. विशेष म्हणजे या शिक्षकाने कुठलाही ऑनलाइन अर्ज केलेला नसताना त्यांना थेट नियुक्तिपत्र कशाच्या आधारे पाठविले, असाही प्रश्न यानिमित्त उपस्थित झाला आहे.