

Nashik tribal protest latest update
esakal
नाशिक: आदिवासी आश्रमशाळांतील पोषण आहारात बदल करणारा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी आदिवासी युवकांनी गुरुवारी पुन्हा आदिवासी विकास आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन केले. आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांच्यासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला.