नाशिक- त्र्यंबक वाहतूक मार्गात दोन दिवस बदल
राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे बदल ः वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा करावा वापर
-----------------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २६ : सिंहस्थ ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या शनिवारी (ता. ३१) त्र्यंबकेश्वर येथे येत असल्याने वाहतुकीचे नियोजन आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. शुक्रवारी (ता.३०) सकाळी ८ ते शनिवारी (ता.३१) रात्री ८ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतुकीत बदल केले आहेत. वाहनचालकांनी अधिसूचनेचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिस व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अपर जिल्हा दंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी केले आहे.
- -
पर्यायी मार्ग
- नाशिक ते त्र्यंबकेश्वर : नाशिक- पिंपळगाव बहुला- संदीप फाउंडेशन- खंबाळे- पेगलवाडी फाटा- त्र्यंबकेश्वर या मार्गाऐवजी अमृत चौक-बारदान फाटा- गोवर्धन- गिरणारे- धोंडेगाव- देवरगाव- वाघेरा फाटा- अंबोली फाटा- सापगाव- त्र्यंबकेश्वर या मार्गाचा वापर करावा.
- त्र्यंबकेश्वर ते नाशिक : जव्हार- मोखाडा- अंबोली- त्र्यंबकेश्वर- पेगलवाडी- खंबाळे- संदीप फाउंडेशन- नाशिक या मार्गाऐवजी जव्हार-मोखाडा- अंबोली टी पॉइंट- वाघेरा फाटा- कोने- साप्ते- देवरगाव- गिरणारे- गोवर्धन- नाशिक या मार्गाचा वापर करावा
- मुंबईकडून येणारी वाहतूक : वैतरणा फाटा- पहिने- त्र्यंबकेश्वर या मार्गाऐवजी वैतरणा फाटा- नाशिक- अमृत गार्डन- बारदान फाटा-गोवर्धन- गिरणारे- धोंडेगाव- त्र्यंबकेश्वर या मार्गाचा वापर करावा.
- पहिने ते नाशिक : पहिने- पेगलवाडी- नाशिक या मार्गाऐवजी पहिने- आहुर्ली- सांजेगाव- वाडीवऱ्हे- नाशिक हा पर्यायी मार्ग वापरावा.
- पहिने ते त्र्यंबकेश्वर : पहिने- पेगलवाडी- त्र्यंबकेश्वर या मार्गाऐवजी पहिने- भिलमाळ- निरगुड पाडा- जांभुळपाडा- सापगाव- त्र्यंबकेश्वर या मार्गाचा वापर करावा.
-------------