नाशिक: श्रावणाच्या पार्श्वभूमीवर देशभरातून त्र्यंबकेश्वरकडे येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली असताना नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील परिस्थिती मात्र अत्यंत विदारक आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. प्रशासनाने कच टाकून हे खड्डे बुजविले असले, तरी त्यातून उडणाऱ्या धुळीमुळे संपूर्ण मार्ग ‘धुळीच्या साम्राज्या’त बुडाला आहे.