नाशिक- येथे खेळविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १९ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत नाशिकच्या संघाने विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे. येथील महात्मानगर क्रिकेट मैदानावर झालेल्या दोनदिवसीय कसोटी सामन्यात यजमान नाशिक संघाने उस्मानाबाद संघावर एक डाव व १३ धावांनी दणदणीत असा निर्णायक विजय मिळवला.