नाशिक : शहरातील बाराशेवर घरे 'धोकादायक' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Twelve hundred houses dangerous

नाशिक : शहरातील बाराशेवर घरे 'धोकादायक'

नाशिक : पावसाळ्याच्या तोंडावर महापालिकेतर्फे पूर्व पावसाळी कामांच्या तयारीला सुरवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून शहरातील मोडकळीस आलेल्या बाराशेहून अधिक धोकादायक घरांना नोटिसा देण्यात आल्या. महापालिका हद्दीत शहरात १२०० वाडे व घरे मोडकळीस आलेले धोकादायक घर आहेत. पावसाळा सुरू होताच शहरात ठिकठिकाणी जुने वाडे, घरे कोसळू लागतात. काहीवेळा वित्तहानी बरोबर जीवितहानी होते. यावर खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील ७०० घर मालकांना लवकरच नोटिसा बजाविण्यात येणार आहे.

महापालिकेने शहरातील जी घरे मोडकळीस आलेली आहेत अशी घरे, वाडे मालकांना महाराष्ट्र महापालिका अधिनियमांचे कलम २६५,२६५ व २६६ नुसार धोकादायक घरे खाली करून देणे आवश्यक असतानाही संबंधित मालक , भोगवटादार खाली करून देत नाहीत असे निदर्शनास आल्याने अशा इमारतींना तातडीने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांचे कलम २६६ नुसार नोटीस बजावल्या आहेत. दरवेळी पावसाळा आला म्हणजे धोकादायक घरांना नोटिसा बजावल्या जातात. या वेळीही औपचारिकतेचा भाग म्हणून महापालिकेतर्फे धोकादायक घरांना नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

दर वर्षी फक्त उपचार

महापालिकेतर्फे तीस वर्षाहून अधिक जुन्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा नियम आहे. त्यामुळे अशा धोकादायक घरात राहणाऱ्या घरमालक, भाडेकरूंनी अशा इमारतींचा धोकादायक भाग स्ट्रक्चरल कन्सल्टंटची मदत घेऊन उतरवून घेताना कोणतीही जीवित अथवा वित्तहानी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन दरवर्षी महापालिकेकडून करण्यात येते. पण दरवेळी फक्त संबंधित इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे आवाहन केले जाते. पण ना घरमालक त्यांच्या धोकादायक इमारतीचे ऑडिट करतात की ना महापालिका करते. केवळ संबंधित घरमालकांच्या लक्षात आणून देण्यापुरता हा विषय हाताळला जातो.

महापालिकेने मारल्यासारखे करायचे आणि धोकादायक इमारतीत राहणाऱ्यांनी रडल्यासारखे करायचे असे या विषयाचे स्वरूप यंदाही कायम आहे. धोकादायक इमारती मोकळ्या कराव्यात. जेणेकरून जीवितहानी टाळता येईल. धोकादायक इमारतींचा भाग उतरविताना काही दुर्घटना घडणार नाही याची काळजी घ्यावी. धोकादायक इमारती, घरे, वाडे त्वरित खाली करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Nashik Twelve Hundred Houses Dangerous Notice To Seven Hundred Homeowners

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top