Goda Swachhta Abhiyan by Sant Nirankari Charitable Trust.
Goda Swachhta Abhiyan by Sant Nirankari Charitable Trust.esakal

Nashik News : अमृतअंतर्गत अडीच टन कचरा, पाणवेली संकलित; स्वच्छतेची प्रार्थना व शपथ

Nashik : अमृसकात प्रोजेक्ट अंतर्गत ‘स्वच्छ जल स्वच्छ मन’ परियोजनेच्या द्वितीय टप्प्याचा प्रारंभ दिल्लीतील यमुना नदीचा छट घाट येथून करण्यात आला.

Nashik News : सदगुरूमाता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेखाली अमृसकात प्रोजेक्ट अंतर्गत ‘स्वच्छ जल स्वच्छ मन’ परियोजनेच्या द्वितीय टप्प्याचा प्रारंभ दिल्लीतील यमुना नदीचा छट घाट येथून करण्यात आला. बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या शिकवणुकीतून प्रेरित अशी ही परियोजना भारताच्या २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील एक हजार ५३३ ठिकाणी अकरा लाखांहून अधिक स्वयंसेवकांच्या सहभागाद्वारे विशाल रूपात यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आली. (nashik Two and half tons of garbage collected under Amrut project marathi news)

पंचवटी येथे गोदावरी नदी व परिसरात राबविलेल्या मोहिमेत सुमारे दोन टन ६८० कचरा संकलित करण्यात आला. सकाळी आठपासून सुरू झालेल्या मोहिमेचा प्रारंभ विभागीय आयुक्त कार्यालयाच्या उपायुक्त मंजिरी मोनालकर, पंचवटीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, संत निरंकारी मंडळाचे सेक्टर संयोजक गुलाब पंजवाणी, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे आदींच्या उपस्थितीत स्वच्छतेची प्रार्थना व शपथ घेऊन करण्यात आला.

मोहिमेत दोनशे पन्नास सेवादल, तर सहाशेहून अधिक निरंकारी बंधू-भगिनी सहभागी झाले होते. या वेळी नदीतील पाणवेली, जुनाट कपडे, तसेच परिसरातील कचरा गोळा करण्यात आला. कचरा उचलण्यासाठी वॉटरग्रेसचे ४५ कर्मचारीही सहभागी होऊन संपूर्ण कचरा खत प्रकल्पावर नेण्यात आला.

Goda Swachhta Abhiyan by Sant Nirankari Charitable Trust.
Nashik News : पाण्याअभावी उभ्या कांद्यात सोडली जनावरे; बागलाण तालुक्यातील स्थिती

‘प्रोजेक्ट अमृत’च्या द्वितीय टप्प्याचा प्रारंभ करताना निरंकारी राजपिता रमितजी यांनी सद्‍गुरु माताजींच्या आशीर्वचनापूर्वी आपल्या संबोधनामध्ये म्हटले, की बाबा हरदेवसिंहजी यांनी आपल्या जीवनात आम्हाला हीच प्रेरणा दिली, की सेवा निष्काम भावनेनेच व्हायला हवी.

माताजींनी प्रोजेक्ट अमृतप्रसंगी आपल्या पावन आशीर्वचनामध्ये सांगितले, की आपल्या जीवनात पाण्याला फार महत्त्व आहे. जल हे अमृतासमान होय. जल आपल्या जीवनाचा मूलभूत आधार आहे. परमात्म्याने आपल्याला ही जी स्वच्छ व सुंदर सृष्टी बहाल केली आहे तिची देखभाल करणे आमचे कर्तव्य आहे. (latest marathi news)

Goda Swachhta Abhiyan by Sant Nirankari Charitable Trust.
Nashik News : राज्यघटनेमुळेच देशात आज एकजूट : न्या. भूषण गवई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com