PM Surya Ghar Yojna : सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी राज्यात पावणेदोन लाख नोंदणी

PM Surya Ghar Yojna : केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना घोषित केल्यावर तिला भरघोस प्रतिसाद मिळाला.
PM Surya Ghar Free Power Scheme
PM Surya Ghar Free Power Schemeesakal

PM Surya Ghar Yojna : केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना घोषित केल्यावर तिला भरघोस प्रतिसाद मिळाला. राज्यात आतापर्यंत एक लाख ७३ हजार २७२ ग्राहकांनी नोंदणी केलेली आहे. मोठ्या प्रमाणात नोंदणी झाल्यावर गेल्या काही दिवसांत योजनेच्या वेबसाईटबाबत ग्राहकांकडून काही तक्रारी येत आहेत. प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेच्या वेबसाईटबाबत वीज ग्राहकांना आलेल्या अडचणींची दखल केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय मंत्रालयाने घेतली आहे. (Two lakh registrations in state for pm Surya Ghar free electricity scheme )

या समस्या सोडविण्यासाठी मंत्रालयातर्फे तज्ज्ञांच्या तुकडीने काम सुरू केले. महिना ३०० युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांना सौरऊर्जा निर्मितीद्वारे मोफत वीज मिळावी, यासाठी केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना फेब्रुवारीत सुरू करण्यात आली. यात तीन किलोवॉटपर्यंतचे रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी केंद्र सरकारकडून मिळते. (latest marathi news)

PM Surya Ghar Free Power Scheme
PM Kisan Yojna: 'या' शेतकऱ्यांनी पैसे परत करण्यास तयार असावे नाही तर कारवाई...

त्यासाठी केंद्रीय मंत्रालयातर्फे वेबसाईट तयार करण्यात आली असून, त्यावर नोंदणी करावी लागते. केंद्र सरकारच्या या योजनेसाठी रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन (आरईसी) ही नोडल एजन्सी आहे. वेबसाईटबाबतच्या अडचणींची माहिती ‘महावितरण’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शनिवारी (ता. २९) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दिली. या वेळी नागपूरमध्ये रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या एजन्सीचे प्रतिनिधीही उपलब्ध होते.

ग्राहकांना येणाऱ्या अडचणींची माहिती दिल्यावर केंद्रीय मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली व समस्या सोडविण्यासाठी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची तुकडी मुंबईत पाठविण्याचे मान्य केले. ‘महावितरण’च्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी केंद्रीय तुकडीला वेबसाईटच्या समस्या सोडविण्यासाठी मदत करतील, असेही व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये ठरले आहे.

PM Surya Ghar Free Power Scheme
PM Surya Ghar Yojana : हर घर सोलर पॅनेल; देशातील 1 कोटी लोकांना मिळणार ३०० युनिटपर्यंत वीज मोफत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com