Nashik News : यू-डायसवर विद्यार्थी नोंदणीचे गुऱ्हाळ थांबणार! गुरुजींची धावाधाव टाळण्यासाठी आताच पोर्टल सुरू

Nashik News : केंद्र सरकारकडून राज्यातील सर्व मान्यताप्राप्त शाळांची माहिती संगणकीकृत केली आहे. या प्रक्रियेअंतर्गत यू-डायस पोर्टलवर सर्व माहिती भरली जाते.
deadline of July 31 to complete student registration process on UDISE portal
deadline of July 31 to complete student registration process on UDISE portalesakal

येवला : शासनाच्या धोरणासह अनुदान निश्चितीसाठी देश व राज्यातील विद्यार्थिसंख्या व विद्यार्थ्यांची माहिती एकत्रित करण्यासाठी यू-डायस प्लस पोर्टलला शिक्षण क्षेत्रात महत्त्व वाढले आहे. मात्र माहितीच्या अभावासह तांत्रिक अडचणींमुळे मागील वर्षी फेब्रुवारी उजाडला तरी विद्यार्थी नोंदणीचे व विद्यार्थी अंतिम करण्याचे गुऱ्हाळ सुरूच होते. (deadline of July 31 to complete student registration process on UDISE portal)

त्यामुळे याप्रश्नी केंद्रीय शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन धोरण निश्चित केले असून, आत्ताच नोंदणीचे पोर्टल सुरू केले आहे, तर ३१ जुलैपर्यंत विद्यार्थी नोंदणीप्रक्रिया पूर्ण करण्याची डेडलाइन दिली आहे. त्यामुळे या वर्षी तरी पोर्टलवरील विद्यार्थी नोंदणीचे गुऱ्हाळ थांबेल, असे दिसतेय. आरटीई कायद्यांतर्गत माहितीचे संकलन आणि माहिती व्यवस्थापन करणे अनिवार्य असून, माहिती संकलन आणि शाळांना युनिक यू-डायस कोड देण्यासाठी यू-डायस प्लस यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.

केंद्र सरकारकडून राज्यातील सर्व मान्यताप्राप्त शाळांची माहिती संगणकीकृत केली आहे. या प्रक्रियेअंतर्गत यू-डायस पोर्टलवर सर्व माहिती भरली जाते. या माहितीच्या आधारेच केंद्र सरकारकडून समग्र शिक्षा योजनेचे वार्षिक नियोजन, शिष्यवृत्ती, पोषण आहार, मोफत पुस्तके, गणवेश आदी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

यू-डायस प्लस प्रणालीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये शाळेची सांख्यिकी माहिती, अनुदान व खर्च, भौतिक सुविधा, संगणक आणि नावीन्यपूर्ण डिजिटल उपक्रम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग आदी माहिती संगणकीकृत करण्यात आली, तर दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे-आईचे नाव, मोबाईल, पत्ता, वर्ग, जनरल रजिस्टर नंबर, जन्मतारीख, जात, दिव्यांगांचे प्रकार, सरकारकडून मोफत देण्यात येणाऱ्या सुविधा. (latest marathi news)

deadline of July 31 to complete student registration process on UDISE portal
Nashik Teacher Constituency : शिक्षक मतदारसंघासाठी पहिल्या दिवशी 3 अर्ज

व्यावसायिक शिक्षण संबंधित माहिती शाळास्तरावरून अद्ययावत केली आहे. विद्यार्थी प्रमोशन, दुसऱ्या शाळेतून विद्यार्थी घेऊन ते अपडेट करणे, आधार क्रमांक जुळवणे अशा अनेक तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी नोंदणीची विविध टप्प्यांवरील प्रक्रिया शैक्षणिक वर्ष संपले तरी शंभर टक्के पूर्ण झालेली नव्हती, हे विशेष.

अनेक राज्यांनी यू-डायसमध्ये २०२३-२४ मधील माहिती अद्याप संकलित केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने सर्व यंत्रणेला पत्र देऊन शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये यूडायस प्रणालीवर माहितीचे संकलन योग्यरीत्या करून डाटा डुप्लिकेशन व ड्रॉप बॉक्स संदर्भातील कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना केल्या आहेत. माहितीचे वेळेत संकलन न झाल्यास आरटीई कायद्याचे उल्लंघन होत असल्याने यूडायसमध्ये माहिती भरण्यासाठी आतापासून पोर्टल उघडण्यात आले आहे.

यूडायसवरील जिल्ह्याचे आकडे

शाळा संख्या - पाच हजार ५६२

एकूण विद्यार्थी - १२ लाख ९१ हजार ९६१

पूर्ण झालेले विद्यार्थी - १२ लाख १२ हजार २५१

आधार व्हॅलिड न झालेले - ५७ हजार ८१५

"यूडायस प्लसवर नोंदणी करताना ग्रामीण भागात इंटरनेट सुविधेसह आधारकार्डची उपलब्धता या अडचणी येतात. अनेक गरीब विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्याचे मागील वर्षी जाणवले. त्यामुळे आधारकार्डची त्रुटी दूर करण्यासाठी गावोगावी आधारकार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध केली, तर हे काम वेळेत पूर्ण होईल." - नाना लहरे, शिक्षकनेते, येवला

deadline of July 31 to complete student registration process on UDISE portal
Nashik News : डॉ. गेडाम यांच्या ‘एंट्री’ ने अधिकाऱ्यांना धडकी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com