esakal | नाशिकमध्ये आता 4 वाजेपर्यंत दुकाने सुरु; जाणून घ्या नेमकं काय सुरु, काय बंद?
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown Nashik

नाशिकमध्ये नवी नियमावली; जाणून घ्या नेमकं काय सुरु, काय बंद?

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : राज्य शासनाने लॉकडाउनचे (Lockdown) निर्बंध शिथिल करण्यासाठी ठरविलेल्या निकषानुसार जिल्ह्यात कोरोना संर्सगाचा दर आठवड्यापासून झपाट्याने घसरत आहे. तब्बल अडीच टक्क्याने हा दर घसरल्याने नाशिकचा तिसऱ्या वर्गवारीत समावेश असल्याने दुकानांच्या वेळा दुपारी दोनऐवजी चारपर्यंत वाढणार आहेत. राज्य शासनाच्या निकषानुसार नाशिकचा संसर्ग दर साधारण पावणेआठ टक्के असून, ऑक्सिजन बेडवर उपचार १८ टक्के आहे. त्यामुळे नाशिकचा तिसऱ्या वर्गात समावेश होणार आहे.(nashik unlock guidelines all shops will be open till 4 pm in nashik district)

३ जूनला संपलेल्या सप्ताहाचा विचार करता, चार दिवसांत नाशिकचा संसर्ग दर ९.२२ हून ८.७६ आणि ७.७६ टक्के इतका कमी झाला आहे. यात दोन दिवसांत आणखी घट अपेक्षित आहे. मृत्युदराचा अपवाद सोडला तर कोरोनाबाधितांच्या संसर्ग दरात आणि ऑक्सिजन बेडची संख्या घटली आहे.

पालकमंत्र्यांकडून आढावा

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शहर आणि जिल्ह्यातील कोरोना संर्सगाच्या अनुषंगाने आढावा घेतला. जिल्ह्यातील कोरोनाच्या संर्सगाचा दर, त्यातील रुग्णांची घटती संख्या यांचा विचार करता शासनाच्या नियमानुसार निर्बंध शिथिल करण्याचे निर्देश दिल्याने काही प्रमाणात सेवा शिथिल होणार आहे. जिल्हा आपत्ती प्राधिकरणाच्या बैठकीत आलेल्या विविध विभागांच्या सूचना विचारात घेऊन जिल्हाधिकारी याविषयी सविस्तर नियमावली जाहीर करतील. दरम्यान, नागरिकांनी काळजी घेतल्यास आणि हे प्रमाण घटत राहिल्यास नाशिक जिल्हा पाच टक्के संसर्ग दराच्या आत येऊन अनलॉक प्रक्रिया गतिमान होऊन पूर्ववत कामकाज सुरू होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: ‘माझी वसुंधरा’ अभियान : नाशिक महापालिकेची सर्वोत्तम कामगिरी!

- दुकानांच्या वेळा दोनऐवजी चारपर्यंत वाढणार

- पन्नास टक्के उपस्थितीत हॉटेलला दिलासा

- शासकीय कार्यालयांत पन्नास टक्के हजेरी

- सायंकाळी पाचपर्यंत जमावबंदी त्यानंतर संचारबंदी

- सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू होऊ शकते

- मोकळी मैदाने, क्रीडांगणावर मर्यादा मुभा

- खासगी दुकाने, व्यापारी आस्थापना चारपर्यंत

- पन्नास जणांच्या उपस्थितीत विवाहांना सूट

- अंत्‍यविधीसाठी वीस जणांची उपस्थिती

-

काय आहेत निकष

वर्गवारी संसर्ग दर ऑक्सिजन बेड रुग्ण निर्बंधाचे स्वरूप

एक ५ टक्केच्या आत २५ टक्के च्या आत नियम पाळून परवानग्या

दोन ५ टक्केच्या आत २५ ते ४० टक्के सोशल डिस्टन्सिंग निर्बंध

तीन ५ ते १० टक्के ४० टक्के हून जास्त ५ पर्यत सवलत वीकेंड लॉकडाउन

चार १० ते २० टक्के ६० टक्केच्या आत ५ पर्यत संचारबंदी

पाच २० टक्केहून जास्त ७५ टक्केहून जास्त संचारबंदी कायम

हेही वाचा: नाशिकमध्ये शहर बससेवेला हिरवा झेंडा; ऑगस्ट पासून सेवा सुरु

शासनाने जिल्हा व महापालिकांसाठी पाच लेव्हल निश्चित केल्या आहेत. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट व वापरात असलेले ऑक्सिजन बेडचे प्रमाण विचारात घेऊन कोणते शहर कोणत्या लेव्हलमध्ये बसते ते निश्चित करायचे आहे. त्यासाठी निश्चित केलेले नियम लागू होतील. स्थानिक परिस्थिती पाहून अंशतः फेरबदल करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला आहेत. महापालिका व जिल्हा अशी पॉझिटिव्हिटी रेट व ऑक्सिजन बेड वापराची माहिती संकलित केली आहे. - सूरज मांढरे (जिल्हाधिकारी, नाशिक)

(nashik unlock guidelines all shops will be open till 4 pm in nashik district)

loading image
go to top