Maratha Kunbi Record : मराठा -कुणबी जातीच्या पावणेदोन लाख नोंदी अपलोड

Maratha Kunbi Record : कुणबी-मराठा जातीच्या सापडलेल्या दोन लाख नोंदींपैकी एक लाख ७२ हजार नोंदीचे स्कॅनिंग आणि अपलोडिंग पूर्ण झाले आहे.
Maratha Kunbi Record ( file photo )
Maratha Kunbi Record ( file photo )esakal
Updated on

Maratha Kunbi Record : जिल्ह्यात मराठा- कुणबी व कुणबी-मराठा जातीच्या सापडलेल्या दोन लाख नोंदींपैकी एक लाख ७२ हजार नोंदीचे स्कॅनिंग आणि अपलोडिंग पूर्ण झाले आहे. उर्वरित नोंदी पुढील आठवडाभरात अपलोड करण्याचे आदेश माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने मंगळवारी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. ()

ऑक्टोबर, नोव्हेंबर २०२३ मध्ये विविध सरकारी यंत्रणांच्या मदतीने मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीच्या नोंदी शोधण्याची मोहीम जिल्ह्यात राबविण्यात आली. जिल्हाभरात एक कोटी ७२ लाख नोंदी तपासण्यात आल्या. त्यापैकी एक लाख ९९ हजार ५४ म्हणजेच जवळपास दोन लाख नोंदी कुणबीच्या आढळल्या.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नेमलेल्या समितीने गावापासून शहरापर्यंत सर्व स्तरावर विविध सरकारी यंत्रणांद्वारे नोंदी शोधल्या. जन्म - मृत्यू नोंदी, शैक्षणिक अभिलेख, महापालिका, नगरपालिकांमधील नोंदी, महसूली अभिलेख, १९६७ पूर्वीचे सेवा पुस्तक, मुद्रांक जिल्हाधिकारी, भूमी अभिलेख विभाग, कारागृह अधीक्षक, पोलिस विभागाकडील नोंदी तपासण्यात आल्या.

Maratha Kunbi Record ( file photo )
Kunbi Record : रेकॉर्ड तपासणीत जालना जिल्ह्यात आढळल्या तीन प्रकारच्या कुणबी नोंदी!

सापडलेल्या कुणबीच्या नोंदींचे स्कॅनिंग करून त्या ड्राईव्हवर अपलोड करण्याचे निर्देश सरकारने दिले होते. या कामाचा आढावा शिंदे समितीने मंगळवारी (ता. २०) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. जिल्हाधिकारी शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ बैठकीला उपस्थित होते.

आढळलेल्या नोंदी हा महत्त्वाचा दस्तऐवज असून त्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामुळेच नोंदीचे रेकॉर्ड जतन करून ठेवण्याकरिता ही सर्व कागदपत्रे स्कॅन करून एका ड्राईव्हमध्ये ठेवण्यात येत आहेत. ( latest marathi news )

Maratha Kunbi Record ( file photo )
Kunbi Record : कन्नड तालुक्यात सर्व मराठा कुणबी; माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर पवार यांचा दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com