Nashik NMC : करसवलत योजना महापालिकेला पावली; मागील वर्षाच्या तुलनेत 21 कोटींची वाढ

Nashik News : महापालिकेच्या महसुलात वाढ करण्याच्या अनुषंगाने १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीसाठी राबविण्यात आलेल्या सवलत योजनेतून विविध कर विभागाला ८२ कोटी ६५ लाख रुपयांचा महसुल मिळाला आहे.
NMC Nashik
NMC Nashik esakal

Nashik News : महापालिकेच्या महसुलात वाढ करण्याच्या अनुषंगाने १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीसाठी राबविण्यात आलेल्या सवलत योजनेतून विविध कर विभागाला ८२ कोटी ६५ लाख रुपयांचा महसुल मिळाला आहे. २ लाख ५ हजार ५०४ मिळकतधारकांनी महापालिकेच्या घरपट्टी सवलत योजनेचा लाभ घेतला आहे. (tax department received revenue of Rs 82 crore 65 lakh from concession scheme)

सवलत योजनेतून सव्वा चार कोटींची सूट मिळविली आहे. तसेच मागील वर्षाच्या तुलनेत महसुलात २१ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. महापालिकेकडून आगाऊ कर अदा करणाऱ्या ग्राहकांसाठी १ एप्रिलपासून कर सवलत योजना सुरू करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात आगाऊ एकरक्कमी कर भरल्यास आठ टक्के, तर मे महिन्यात सहा टक्के व जून महिन्यात तीन टक्के सवलत आहे.

त्याचबरोबर सौरऊर्जा प्रकल्प, सोलर वॉटर हिटर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सांडपाण्याचा पुनर्वापर करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना पाच टक्के सवलत आहे. इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन असल्यासदेखील दोन टक्के सवलत आहे. डिजिटल पेमेंट केल्यास पाच टक्के किंवा तीन हजार रुपये यापैकी कमी असेल ती रक्कम देय राहणार आहे.

या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, १ एप्रिल ते ३० मे २०२४ या कालावधीत दोन लाख लाख ५ हजार करदात्यांनी ८२ कोटी ६५ लाख रुपये मालमत्ता कर अदा केला आहे. सातपूर विभागात २१ हजार ८१६ मिळकतधारकांनी १० कोटी, पश्चिम विभागात २३ हजार ८०५ मिळकतधारकांनी १६.७९ कोटी, पूर्व विभागातील ३७ हजार ५८८ मिळकतधारकांनी १३. १३ कोटी, पंचवटी विभागात ३७ हजार ४२९ मिळकतधारकांनी १५.१८ कोटी. (latest marathi news)

NMC Nashik
Nashik Teacher Constituency : शिक्षक मतदारसंघासाठी पहिल्या दिवशी 3 अर्ज

सिडको विभागात ४७ हजार ६९२ मिळकतधारकांनी १६.४७ कोटी, नाशिक रोड विभागात ३७ हजार १७४ मिळकतधारकांनी ११ कोटी रुपयांची घरपट्टी भरली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत महसुलात २१ कोटी रुपयांनी वाढ झाली.

सोलर प्रकल्प असणाऱ्या मिळकतधारकांनी १६ लाख २४ हजार ९२४ रुपयांची अतिरिक्त सवलत मिळविली. एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी असलेल्या सवलत योजनेचा ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन विविध कर विभागाचे उपायुक्त विवेक भदाणे यांनी केले.

विभागनिहाय वसुली (कोटीत)

विभाग वसुली

पश्चिम १६.७९

पूर्व १३.१३

पंचवटी १५.१८

सिडको १६.४७

सातपूर १०

नाशिक रोड ११

--------------------

एकूण ८२.६५

NMC Nashik
Nashik News : विभागीय आयुक्तपदी डॉ. प्रवीण गेडाम; राधाकृष्ण गमे निवृत्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com