

नाशिक : स्मार्टसिटी कंपनीकडून गावठाणात तयार केलेले सिमेंट काँक्रिटचे रस्ते महापालिकेकडे हस्तांतरित केले जाणार आहे. मात्र हस्तांतरित करताना महापालिकेच्या बांधकाम विभागाने रस्त्यांची तांत्रिक तपासणी करण्याबरोबरच कागदपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामागे भविष्यात कायदेशीर बाब निर्माण झाल्यास अडचण नको म्हणून ही तजवीज केली जात आहे.