
नाशिक : नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात नव्याने नोंदविण्यात आलेल्या मतदारांमध्ये बोगस नावांचा समावेश असल्याची तक्रार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केली आहे. या विरोधात प्रशासनाने कार्यवाही करण्याची मागणी या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा व निवडणूक उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्याकडे केली. शिवसेनेच्या (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. १६) जिल्हाधिकाऱ्यांची याप्रश्नी भेट घेत चर्चा केली. (Bogus voters in Nashik Central Voter List by Shiv Sena to District Collector )