dilip datir
dilip datiresakal

Nashik Vidhan Sabha Election : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत नाराजीचे फटाके; माजी जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांचा राजीनामा

Latest Vidhan Sabha Election News महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मनसेत नाराजीचे फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे.
Published on

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते दिनकर पाटील यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मनसेत नाराजीचे फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे. या मतदारसंघातून इच्छुक असलेले माजी जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांनी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात सर्वत्र उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. (vidhan sabha election Resignation of former district president Dilip Datir )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com