Patta Killa Vishramgad Fort : छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य लाभलेला 'पट्टा किल्ला' म्हणजेच 'विश्रामगड'!

Shiv Jayanti 2024 : शिवजन्मोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पट्टा किल्ला म्हणजेच विश्रामगडावर टाकलेला हा प्रकाशझोत...
Patta Killa Vishramgad Fort
Patta Killa Vishramgad Fortesakal

Patta Killa Vishramgad Fort : छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर एखाद्या गडावर जास्त काळ वास्तव्य केलेले असेल असे घडले नाही. रायगड, राजगड यासारखे मानाचे किल्ले (Forts of Maharashtra) या यादीतून तुम्ही वगळू शकता परंतु अशा महाराजांच्या विश्रामाच्या किल्ल्यांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर- नाशिक सीमेवरील पट्टागडाला देखील हे भाग्य लाभले आहे. (nashik Vishramgad Fort Patta killa shivjayanti 2024 marathi news)

गडावर असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती.
गडावर असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती.esakal

असे झाले नामकरण

छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य लाभलेला 'पट्टा किल्ला' म्हणजेच 'विश्रामगड'. जालन्याची लढाई जिंकून रायगडाकडे जात असताना मुघलांनी राजांची वाट अडवली. तेव्हा बहिर्जी नाईक यांच्या चातुर्याने मुघलांच्या हातावर तुरी देत महाराजांनी पट्टाकिल्ला गाठला.

किल्ल्यावरील नैसर्गिक वातावरण आणि हवामान महाराजांना अल्हाददायक वाटल्याने तब्बल ३५ दिवस महाराजांनी तेथे वास्तव्य केले. क्षीण घालवणारा किल्ला म्हणून महाराजांनी पट्टा किल्ल्याचे 'विश्रामगड' असे नामकरण केले. छत्रपती श्री शिवाजी महाराज आपल्या आयुष्यात खूप कमी गडांवर एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीत राहिले त्यापैकी एक म्हणजे विश्रामगड आहे.

सुरतेवर छापा टाकून आल्यानंतर महाराजांनी याठिकाणी एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी विश्राम घेतला म्हणून या गडाला विश्रामगड असेही नाव पडलेले आहे. अप्रतिम सौंदर्य लाभलेला हा किल्ला अनेक गोष्टींसाठी वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो.(Latest Marathi News)

किल्ल्यावरील माहितीदर्शक फलक.
किल्ल्यावरील माहितीदर्शक फलक.esakal
Patta Killa Vishramgad Fort
Mahur Ramgad Fort : माहूरच्या ‘रामगड’ किल्ल्याचे रूप पालटणार; १३ कोटी ८७ लाखांचा विकास आराखडा

किल्ल्यावर बनवले जलसाठे

किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी खडकांमध्ये बनवले गेलेले जलसाठे म्हणजेच टाके मोठ्या प्रमाणावर आहेत. यातील पाणी अत्यंत थंड आणि चवदार असते. त्याचबरोबर किल्ल्याचा परिसर अत्यंत सुंदर आणि मनमोहक आहे. किल्ल्यावरील स्वच्छ आणि थंडगार हवा पर्यटकांना आकर्षित करते. स्वच्छ आणि सुंदर प्रदूषण मुक्त ऑक्सिजन किल्ल्यावर विपुल प्रमाणात आहे.

विविध जंगली झाडांनी हा परिसर व्यापलेला आहे. गावठी आंबे, जांभूळ, अर्जुन सादडा, काटेसावर, मोह, हिरडा, बेहडा, चंदन, करवंद अळीव असे नानाविध वनस्पतींनी परिसर नटलेला आहे. किल्ल्यावरून आजुबाजूचा परिसर न्याहाळता येतो.

किल्ल्याच्या उंच सखल भागात गेल्यानंतर तेथून आजूबाजुची गावे आणि परिसर अत्यंत मनमोहक दिसतो. त्यातच सध्या सुरू असलेला ऊन सावलीचा खेळ व त्यातून पावसामुळे बहरलेली निसर्गराजी यांचा उत्तम मिलाफ झालेला दिसतो. नैसर्गिक सौंदर्य न्याहाळणार्‍या पर्यटकांना ही जणू पर्वणीच आहे.

जवळच असलेल्या नाशिक, सिन्नर इगतपुरी , कसारा, संगमनेर या शहरांमधून पर्यटक मोठ्या प्रमाणावर पट्टा किल्ल्यावर येत असतात. आजही हा किल्ला सर्वांसाठी आदर्श आणि प्रेरणास्थान आहे. किल्ल्यावर गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आलेला आहे.

किल्ला चढताना थकून-भागून गेलेल्या पर्यटकांना शिव स्मारका समोर नतमस्तक झाल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा मिळते. त्याचबरोबर जुन्या माचीचे रूपांतर आता सुंदर आशा शिवसृष्टीत करण्यात आलेले आहे. पर्यटकांना याठिकाणी विसावा घेता घेता शिवरायांची अनेक रूपे न्याहाळता येतात. किल्ला आणि परिसरातील विकास कामांमुळे पर्यटन विकासाला चालना मिळत आहे.

स्थानिक ग्रामस्थांना बर्‍यापैकी रोजगार उपलब्ध होत आहे. वनविभागाने याठिकाणी शुल्क आकारणी सुरू केल्यानंतर परिसराची निगा आणि जोपासना करण्यास त्याची मदत होत आहे. वनविभाग स्थानिक वृक्षांचे संवर्धन करताना नवीन झाडांची लागवड सातत्याने करून परिसर सुंदर करण्यासाठी प्रयत्नरत आहे.

जागोजागी माहितीपत्रके व पर्यटकांसाठी सूचना फलक लावून स्वच्छतागृह, कचरा साठवण्यासाठी कचरा कुंड्यांची व्यवस्था करणे परिसराचे सौंदर्य जपण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. (Latest Marathi News)

Patta Killa Vishramgad Fort
MP Forts Travel : फक्त महाराष्ट्रातच नाही तर MP मध्ये देखील आहे मराठा साम्राज्यातील किल्ले, नक्की भेट द्या

असा आहे गडाचा इतिहास

पट्टागडाचे बांधकाम हे बहमनी सल्तनतच्या काळात झाले. इ.स. 1347 ते इ.स. 1490 या काळात किल्ल्याचे बांधकाम झाले असावे. बहमनी सल्तनतीनंतर गडाचा ताबा हा महादेव कोळी जमातीकडे गेला होता. बहमनी सत्तेचे तुकडे झाल्यानंतर हा किल्ला निजामशाही कडे आला व पुढे इ.स. 1627 मध्ये मोघलांनी पट्टागड जिंकून घेतला.

पट्टागडाच्या इतिहासावर नजर टाकल्यास हा किल्ला इ. स. 1671 मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी मोगलांकडून जिंकून स्वराज्यात सामील केला असे आढळते. पुढे जालनापूरच्या लुटीनंतर राजे काही काळ या गडावर विश्रांतीसाठी थांबले होते. शिवाजी महाराज 16 नोव्हेंबर 1679 रोजी जालण्याची लूट करून परतत असताना मोगल सरदार रनमस्तखान महाराजांवर चाल करून यायला निघाला.

यावेळी महाराजांच्या समवेत भरपूर खजिना लूट होती आणि लांबच्या प्रवासाने मावळे थकलेले होते. अशा वेळी युद्ध करणे हा पर्याय नव्हता त्यामुळे महाराजांची आणि सैन्याची सुरक्षित पट्टागडावर पोहोचण्याची व्यवस्था ही बहिर्जी नाईक यांनी केली. बऱ्याच दिवसांची धावपळ आणि दगदगीने महाराज व सैन्य थकले होते त्यामुळे महाराजांनी पट्टागडावर 15 दिवस विश्रांती घेतली.

ज्या पट्टागडावर महाराजांना संकटाच्या काळात विश्रांती मिळाली त्या गडाचे नामकरण महाराजांनी विश्रामगड असे केले. पुढे अवघ्या पाच महिन्यांत स्वराज्याच्या अखंड भास्कराचा अंत झाला. त्यामुळे शेवटच्या काळात विश्राम घेतलेल्या विश्रामगडाला महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे व हे अनोखे वैभव जपण्याचे काम पट्टा गडावर झालेले आहे.

राहण्याची व खाण्यापिण्याची सोय

पट्टागडावर दोन मोठ्या गुहा आहेत. या गुहांमध्ये राहण्याची सोय करता येते. किंवा गडावरील अंबरखाना मोठा आहे इथे आपण राहू शकतात. जेवणाची सोय मात्र स्वतः करावी लागते. पट्टावाडीत सुद्धा राहता येते. रात्री पट्टावाडीत मुक्काम करून सकाळी गड पाहण्यास जाता येते.

गडाचे नाव- पट्टागड

समुद्रसपाटीपासूनची उंची- 4562 फूट

गडाचा प्रकार- गिरिदुर्ग

चढाईची श्रेणी- सोपी

डोंगररांग- कळसुबाई, सह्याद्री

जवळचे गाव- पट्टावाडी, कोकणवाडी

जिल्हा- अहमदनगर

Patta Killa Vishramgad Fort
Raigad Fort : बघाच एकदा रायगड, वेड लागेल त्याचे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com