Election
sakal
आकाश पगार- नवीन नाशिक: सिडको आणि अंबड औद्योगिक वसाहतीच्या सीमारेषेवरील हा प्रभाग शहराच्या वाढत्या औद्योगिकरणाचा केंद्रबिंदू मानला जातो. त्यामुळे येथे विकासाचा महापूर असेल, असे वाटते. पण प्रत्यक्षात येथे पाहिजे तसा विकास झालेला नाही. मूलभूत सुविधांचा अभाव या प्रभागात जाणवत आहे. हाच मुद्दा यंदाच्या निवडणुकीत स्थानिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा राहणार आहे.