Nashik Unseasonal Rain : वाळवीच्‍या पावसात शहर 'डबकेमय'; ठिकठिकाणी साचले डबके

Nashik News : दोन दिवसांत शहरासह उपनगरीय भागांमध्ये वाळवीच्‍या पावसाने हजेरी लावली. या तुरळक स्वरूपाच्या पावसाने शहरात ठिकठिकाणी डबके साचले.
Water puddles on various roads in the suburbs due to two days of rain in the city.
Water puddles on various roads in the suburbs due to two days of rain in the city.esakal

Nashik News : गेल्‍या दोन दिवसांत शहरासह उपनगरीय भागांमध्ये वाळवीच्‍या पावसाने हजेरी लावली. या तुरळक स्वरूपाच्या पावसाने शहरात ठिकठिकाणी डबके साचले. यात प्रामुख्याने चौक, सर्कल, तसेच रस्‍त्‍याच्‍या कडेला पाणी साचले होते. दरम्‍यान विविध शासकीय यंत्रणांकडून मॉन्‍सूनपूर्व कामे सुरु असताना, वाळवीच्‍या पावसात तारांबळ उडाल्‍यामुळे आता कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी यंत्रणेची लगबग बघायला मिळते आहे. (Water accumulated due to Unseasonal Rain)

हवामान खात्‍याने वर्तविलेल्‍या अंदाजानुसार राज्‍यात ठिकठिकाणी बेमोसमी पाऊस सुरु आहे. नाशिक शहरात शुक्रवारी (ता.१०) आणि शनिवारी (ता. ११) सलग दोन दिवस वाळवीच्‍या पावसाने हजेरी लावली. तसेच रविवारी (ता. १२) पहाटे काही मिनिटांसाठी जोरदार पाऊस बरसला. दरम्‍यान दोन दिवस पाऊस सुरु होण्यापूर्वी वातावरणात सोसाट्याचा वारा सुटला होता.

यामुळे शहरासह उपनगरीय भागांमध्ये अनेक ठिकाणी झाडे उन्‍मळून पडल्‍याच्‍या घटना समोर आल्‍या होत्‍या. तर काही ठिकाणी झाडाच्‍या फांद्या कोसळल्‍या होत्‍या. रविवारी (ता.१२) सकाळी झालेल्‍या पावसानंतर शहरात ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचलेले बघायला मिळाले. यात प्रामुख्याने शहरातील शालिमार चौक. (latest marathi news)

Water puddles on various roads in the suburbs due to two days of rain in the city.
Nashik Unseasonal Rain News : अवकाळी, वादळी पावसाने मोसम खोऱ्यामध्ये मोठी हानी

सांगली बँक चौक, यासह गंगापूर रोड, कॉलेजरोड व इतर भागांमध्ये चौक, रस्‍त्‍यांच्‍या कडेला पाण्याचे डबके साचलेले होते. सध्या महापालिकेसह इतर विविध यंत्रणांकडून मॉन्‍सूनपूर्व तयारीची कामे सुरु आहेत. त्‍यातच वाळवीच्‍या पावसामुळे तारांबळ उडाल्‍याने यंत्रणांकडून कामे पूर्ण करण्यासाठी गती दिली जाते आहे.

विजेचा लपंडाव, अन्‌ नागरिकांचा मनस्‍ताप

दरम्‍यान गेली दोन दिवस शहरात अनियमित विद्युत पुरवठा हा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शुक्रवार आणि शनिवारी सातत्‍याने विजेचा लपंडाव सुरु राहिला. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्‍या नागरिकांना मनस्‍तापाला सामोरे जावे लागले. किमान आगामी पावसाळ्यात विद्युत पुरवठा सुरळीत राहील, यासाठी संबंधित विभागाने आवश्‍यक उपाययोजना कराव्‍यात, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली जाते आहे.

Water puddles on various roads in the suburbs due to two days of rain in the city.
Nashik BJP News : काँग्रेसला मोठा धक्का! प्रदेश सरचिटणीस डॉ. तुषार शेवाळे यांच्या भाजप प्रवेशाने खळबळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com