

Nashik News : ट्रॅक्टर हाऊस भागात उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचले. यामुळे काही वाहने अर्धे बुडाले होते. पाण्यातून मार्ग काढणे धोक्याचे असल्याने वाहनधारकांनी थांबणे पसंत केले. त्यामुळे सुमारे दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी (ता.१९) दुपारी साडेतीनच्या सुमारास जोरदार पावसाने शहराला झोडपून काढले. अर्धा तास झालेल्या जोरदार पावसाने सर्वत्र धावपळ उडवली. ( Water accumulated in tractor house area due to heavy rain )