Nashik Water Management : विभागात 33 टँकर भागवतात पाण्याची तहान

water management
water managementesakal

Nashik Water Management : सध्या निसर्गाचे अस्मानी आणि सुलतानी संकट घोंघावत असताना उत्तर महाराष्ट्रात येणाऱ्या नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यात व ५४ तालुक्यात ३३ टँकर सुरू आहे. (Nashik Water Management 33 tankers quench thirst of water in division news)

नाशिक विभागात येणाऱ्या पाच जिल्ह्यांमध्ये नाशिकला २१ टँकर पोहोचवली जात आहे. शासकीय आणि खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामध्ये येवला तालुका (१३), मालेगाव (३) देवळा (१) चांदवड (३) तर बागलाण तालुक्यात १ टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे.

जळगाव जिल्ह्यात केवळ १० टँकर सुरू असून पारोळा तालुक्यात २, भडगाव (२), चाळीसगाव (२), बोदवड (१) तर जामनेरला ३ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. महाराष्ट्रातला सर्वात क्षेत्रफळाने मोठा जिल्हा समजला जाणारा अहमदनगर जिल्ह्याला केवळ २ टँकर सुरू आहेत. त्यात संगमनेर आणि अकोले या तालुक्यांना प्रत्येकी १ टँकरने पाणी पुरवठा येत होत आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

water management
Godavari Maha Aarti : गोदावरी आरतीसाठी दोन टप्प्यात 42 कोटीचा आराखडा

धुळे- नंदुरबारकडून टँकर पुरवठा शून्य

उत्तर महाराष्ट्रात धुळे नंदुरबार आणि जळगाव हे दुष्काळी जिल्हे समजले जातात. मात्र त्यामध्ये धुळे आणि नंदुरबारला एकही टँकरने पाणी पुरवठा सुरू नसल्याचे प्रशासनाकडे प्राप्त आकडेवारीवरून दिसून येते.

"सध्या अस्मानी संकट घोंगावत आहे. त्यामुळे पाऊस उन्हाळ्यात पडतो आहे. तो पावसाळ्यात शाश्वत पडेल याची खात्री सध्या देऊ शकत नाही. पाणी प्रत्येकाने जपून वापरले पाहिजे. यासाठी उन्हाळ्यात पाणी वापरावर जनजागृती आवश्यक आहे. सध्या निसर्गचक्र अशाश्वत आहे. त्यामुळे पिकांबरोबरच शेतीचे नुकसान होत आहे. अशातच उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष असून पाणी बचत ही आजची मूलभूत गरज आहे."- विष्णुपंत गायखे, कृषी अभ्यासक

water management
Special Train : धुळ्याहून दादरपर्यंत विशेष रेल्वेगाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com