Nashik News : पालखेडच्या आवर्तनाचे पाणी मुरले कुठे? येवल्यासाठी भरून मागितला 4 मीटर तलाव, भरला तीनच मीटर

Nashik News : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावात नगरपालिकेने पाटबंधारे विभागाकडे चार मीटरपर्यंत तलाव भरून देण्याची मागणी केली होती
Water from the lake that supplies water to the city of Yewla.
Water from the lake that supplies water to the city of Yewla.esakal

येवला : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावात नगरपालिकेने पाटबंधारे विभागाकडे चार मीटरपर्यंत तलाव भरून देण्याची मागणी केली होती. मात्र, पाटबंधारे विभागाने केवळ तीनच मीटर पाणी दिल्याने जूनपर्यंत शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. सर्वांनाच कमी प्रमाणात पाणी दिल्याने पुरेसे पाणी सोडूनही पालखेडच्या आवर्तनाचे पाणी मुरले कुठे, असा सवाल उपस्थित होत आहे. (Nashik water of Palkhed cycle 3 meter filled news)

पालखेड डाव्या कालव्यावरील पाणी योजनांचे साठवण तलाव कोरडे झाल्याने येवल्यासह मनमाडवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले होते. या पार्श्‍वभूमीवर पालखेड पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने २५ मार्चला सोडलेले बिगरसिंचन आवर्तन ९ एप्रिलला बंद झाले.

येवला शहर तसेच येवल्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजना आणि मनमाड शहर, मनमाड मध्य रेल्वे या चार योजनांचे तलाव भरून देण्यासाठी ३३० दलघफू घनफूट, तर आकस्मिक आरक्षणावरील गावांतील बंधारे, साठवण तलावात पाणी देण्यासाठी १०५५ दलघफू पाणी पालखेड डाव्या कालव्यात सोडले होते.

या पाण्याने प्राधान्याने मनमाड, येवल्याच्या योजनांचे दोन्ही तलाव, दिंडोरी तालुक्यातील पालखेड जलाशयातून मातेरेवाडी, अवनखेड, पालखेड बंधारा, खडकसुकेणे, कुर्णोली, लोखंडेवाडी, जोपूळ व चिंचखेड या गावांना ४३ दलघफू पाणी देण्यात येणार आहे.

तर निफाड तालुक्यातील कादवा नदीवरील साकोरे, उंबरखेड, कोकणगाव, शिरसगाव, बेहेड, नारायणटेंभी, वडाळी नजिक, कारसुळ, रौळस पिंप्री, कुंदेवाडी, पालखेड डाव्या कालव्यावरील कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत, आहेरगाव, लोणवाडी, दावचवाडी, पंचकेश्‍वर, देवपूर, कुंभारी, नांदुर्डी, शिवडी, उगाव, खेडे, वनसगाव व गोई नदीवरील पाचोरे खु॥, पाचोरे बु॥, मरळगोई खु॥, मरळगोई बु॥, गोंदेगाव, गोळेगाव व वाहेगाव या गावांसाठी ५२४ दलघफू पाणी देण्यात येणार होते.  (latest marathi news)

Water from the lake that supplies water to the city of Yewla.
Nashik Water Crisis : पाण्याचे दुर्भिक्ष्य, उष्णतेमुळे फळबागा संकटात! डाळिंबाच्या लागवड क्षेत्रात देवळ्यात मोठी घट

टंचाईग्रस्त गावांना दिलासा

येवला तालुक्यातील पाटोदा, रायते, बल्हेगाव, पिंपरी, कोटमगाव खु॥, पिंपरी, कोटमगाव खु॥, शेवगे, सातारे, जऊळके, भाटगाव, नागडे, मातुलठाण व बोकटे या गावांसाठी ४८८ दलघफू असे एकूण १०५५ दलघफू आकस्मिक आरक्षणाचे पिण्याचे पाणी मिळणार असल्याने दुष्काळाच्या रणरणत्या उन्हात व टंचाईत या गावांना दिलासा मिळाला आहे. अर्थात, हे कागदावरचे आकडे असून, प्रत्यक्षात सर्वांनाच कमी प्रमाणात पाणीपुरवठा झाला आहे.

Water from the lake that supplies water to the city of Yewla.
Nashik Water Crisis: निम्म्या देवळा तालुक्याची भिस्त टॅंकरवर! 24 गावे 37 वस्त्यांना तीस टॅंकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com