Nashik News : जिल्ह्यात सोमवारपासून ‘जलसमृद्ध नाशिक’ अभियान; 100 कोटी लिटर क्षमता वाढविण्याचा निर्धार

Nashik : शहरातील प्रसिद्ध उद्योजक, बांधकाम व्यावसायिकांसह विविध सामाजिक संघटनांनी गंगापूर धरणातून गाळ काढण्यासाठी ‘जलसमृद्ध नाशिक’ उपक्रम हाती घेतला आहे.
Collector Jalaj Sharma giving information about Jalsamruddha Nashik campaign. Neighbor Dr. Ashok Karanjkar, Ashima Mittal, Sonal Shahane, Haribhau Gite.
Collector Jalaj Sharma giving information about Jalsamruddha Nashik campaign. Neighbor Dr. Ashok Karanjkar, Ashima Mittal, Sonal Shahane, Haribhau Gite.esakal

Nashik News : शहरातील प्रसिद्ध उद्योजक, बांधकाम व्यावसायिकांसह विविध सामाजिक संघटनांनी गंगापूर धरणातून गाळ काढण्यासाठी ‘जलसमृद्ध नाशिक’ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत दिवसाला पाच हजार क्युबिक मीटर गाळ काढून धरणाची शंभर कोटी लिटर क्षमता वाढविण्याचा निर्धार केला आहे. या उपक्रमामुळे दोन महिन्यांत धरणाच्या साठवण क्षमतेत साधारणत: ३५ दशलक्ष घनफूट वाढ होईल. (nashik Water rich Nasik campaign from Monday in district marathi news )

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट हॉलमध्ये गुरुवारी (ता. ११) ‘जलसमृद्ध नाशिक’ची बैठक पार पडली. या वेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, मृद व जलसंधारण विभागाचे प्रादेशिक अधिकारी हरिभाऊ गिते, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे व्यासपीठावर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, की लोकसहभाग व प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या अभियानातून हरित नाशिक व पाण्याने समृद्ध असलेला जिल्हा साकार करावयाचा आहे. जिल्ह्यातील इतर धरणे, नदी व जलाशयातून गाळ काढण्यात येणार आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना हा सुपीक गाळ त्यांच्या शेतात टाकण्यासाठी विनामूल्य उपलब्ध होईल.

यातून मोठ्या जलाशयांची पाणीसाठवण क्षमता वृद्धीस लागून शेतकऱ्यांच्या जमिनी सुपीक होऊन उत्पादनक्षमता वाढणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. फक्त गंगापूरच नव्हे, तर जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणांसह पाझर तलवांतूनही गाळ काढण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले. या संपूर्ण अभियानात महापालिकेचा सक्रिय सहभाग राहील, असे आश्‍वासन आयुक्त डॉ. करंजकर यांनी दिले. (latest marathi news)

Collector Jalaj Sharma giving information about Jalsamruddha Nashik campaign. Neighbor Dr. Ashok Karanjkar, Ashima Mittal, Sonal Shahane, Haribhau Gite.
Nashik News : चारा छावण्यांची आशाही मावळली! ना डोंगरावर गवत ना पठारावर चारा

‘नरडेको’चे अध्यक्ष सुनील गवांदे यांनी स्वागत केले. भारतीय जनसंघ संघटनेचे नंदकुमार साखला यांनी सूत्रसंचालन केले. रेनबो संस्थेचे प्रशांत परदेशी, राह फाउंडेशनचे ऋषीकेश पाटील, विजयेश्‍वरी संस्थेचे मनोज साठे, रमेश वैश्‍य, अंबरीश मोरे, सीए असोसिएशनचे संजय तांबुळवाडीकर, टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अक्षय सोनजे, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद सजगुरे यांनीही आपले विचार मांडले.

''‘जलसमृद्ध नाशिक’ या अभियानाचा सोमवारी (ता. १५) गंगापूर धरणाजवळील गंगावऱ्हे गावातून सकाळी आठला प्रारंभ होणार आहे. या अभियानात नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.''- जलज शर्मा, जिल्हाधिकारी

या सुविधांचा मिळणार लाभ

‘जलसमृद्ध नाशिक’ अभियानात सहभागी होणाऱ्या उद्योजक-व्यावसायिकांना ‘सीएसआर’ निधीतून मदत करता येणे शक्य आहे. तसेच करदात्यांनाही सवलत मिळणार असल्याने या अभियानास सर्वांनी आर्थिक पाठबळ देण्याचे आवाहन ‘बीजेएस’चे नंदकुमार साखला यांनी केले आहे. यासाठी स्वतंत्र बँक खाते तयार केले जाणार असून, सर्वांना दोन दिवसांत आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता केली जाईल, असे आश्‍वासन प्रसिद्ध उद्योजक जयेश ठक्कर यांनी दिले.

Collector Jalaj Sharma giving information about Jalsamruddha Nashik campaign. Neighbor Dr. Ashok Karanjkar, Ashima Mittal, Sonal Shahane, Haribhau Gite.
Nashik News : मोगरे येथे उन्हाळी नागली व वरईचा प्रयोग; बियाणे वाढविण्यासाठी सेंद्रिय नागलीचे अंतरपीक

...कोण काय म्हणाले...

''नाशिकमध्ये बंगळूरसारखी परिस्थिती निर्माण व्हायला नको, म्हणून आतापासूनच प्रयत्न करायला हवेत. सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले तर पुढील दहा पिढ्यांसाठी पाणी साठविले जाऊ शकते. त्यादृष्टीने सर्वांनी या अभियानात उतरायला हवे.''- विजय हाके, आर्ट ऑफ लिव्हिंग

''पाणी साठवण क्षमता वाढवत असताना वृक्ष लागवडही व्हायला हवी. यापूर्वी आम्ही दहा लाखांवर झाडे लावली आणि जतन केली आहेत. यापुढेही आमच्या शिक्षण संस्थेतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वृक्षलागवडीत प्रशासनाला पूर्णत: सहकार्य करू.''- मिलिंद वैद्य, सचिव, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी

''बांधकाम व्यावसायिकांची संघटना म्हणून ‘क्रेडाई’ २०१६ पासून धरणातील गाळ काढण्याचे काम करते. आजपर्यंत २० हजार ब्रास गाळ काढला. या अभियानाची व्याप्ती वाढविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करीत आहोत. त्याचाच भाग म्हणजे ‘जलसमृद्ध नाशिक’ हा उपक्रम आहे.''- कृणाल पाटील, अध्यक्ष, ‘क्रेडाई’

''नाशिकमधील प्रत्येक व्यक्तीला या अभियानाशी जोडून घेतले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीसाठी एक क्यूआर कोड तयार केला तर ‘जलसमृद्ध नाशिक’ अभियान ही लोकजळवळ म्हणून उभी राहील. औद्योगिक क्षेत्रासह सर्वसामान्य जनतेने आतापासूनच पाणी वाचविले पाहिजे.''- धनंजय बेळे, अध्यक्ष, ‘निमा’

Collector Jalaj Sharma giving information about Jalsamruddha Nashik campaign. Neighbor Dr. Ashok Karanjkar, Ashima Mittal, Sonal Shahane, Haribhau Gite.
Nashik News : गोदावरी नागरी सहकारी बँकेला 3.16 कोटींचा नफा : अमृता पवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com