.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक : चुंचाळे पंपिंग स्टेशन येथे जलवाहिनीला गळती लागल्याने दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. नॉन रिटर्न न व्हॉल्व खालील काँक्रिट तोडून टेल पीस टाकणे व त्यानंतर पुन्हा काँक्रिट ब्लॉक भरणे आवश्यक असल्याने सातपूर व सिडको भागातील पाणी पुरवठा विस्कळित होणार असून १६ व १७ जानेवारीला पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच १८ जानेवारीला कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.