Nashik Water Shortage : कपातीतून 25 दशलक्ष घनफूट पाण्याची बचत; गावठाण भागात टँकरने पाणीपुरवठ्याची वेळ

Water Shortage : जून महिन्यात वेळेत पावसाचे संकेत हवामान विभागाकडून मिळतं असले तरी जोपर्यंत धरणात पुरेशा पाणीसाठा होत नाही तोपर्यंत पाणी जपून वापरावे लागणार आहे.
Water Shortage
Water Shortageesakal

Nashik Water Shortage : जून महिन्यात वेळेत पावसाचे संकेत हवामान विभागाकडून मिळतं असले तरी जोपर्यंत धरणात पुरेशा पाणीसाठा होत नाही तोपर्यंत पाणी जपून वापरावे लागणार आहे. शनिवारी सुटीच्या दिवशी शहरात अघोषित पाणी कपात करण्यात आली. मे महिन्यात अघोषित कपातीतून जवळपास २५ दशलक्ष घनफूट पाण्याची बचत करण्यात आली आहे. कपातीमुळे गावठाण भागात टॅन्करने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. (Water Shortage Saving 25 million cubic feet of water through reduction )

मेंढीगिरी समितीच्या अहवालानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने मराठवाड्यासाठी ८.६ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर जवळपास दीड टीएमसी पाणी वाचले. परंतु दुसरीकडे पाणी कमतरतेमुळे महापालिकेच्या आरक्षणात कपात करण्यात आली. नाशिकसाठी ५,३१४ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले. शहराला दररोज २० दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा होतो.

सद्यःस्थितीत उपलब्ध पाण्याचा विचार करता ३१ जुलैपर्यंत पाणी पुरवावे लागणार आहे. परंतु रोजचा पाणी वापर लक्षात घेता अठरा दिवसांच्या पाण्याचा शॉर्टफॉल आहे. दरम्यान, उष्णता वाढल्याने उन्हाचा चटका वाढल्याने बाष्पीभवनबरोबरचं पाण्याची मागणी वाढली. ५९९ पर्यंत जलपातळी आल्यास नाशिककरांसमोर जलसंकट उभे राहणार आहे. महापालिकेने दुरुस्तीच्या नावाखाली अघोषित पाणीकपात सुरू केली आहे.

त्यातून मे महिन्यात २५ दशलक्ष घनफूट पाण्याची बचत करण्यात आली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे संकेत देण्यात आले असले तरी धरणात पुरेसा पाणीसाठा होत नाही, तोपर्यंत अघोषित कपात सुरुच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, शनिवारी (ता. १) अघोषित पाणीकपातीचा फटका बसला. जुने नाशिक,पंचवटी विभागात काही भागात पाणी आले तर काही भागात पाणी आले नाही. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा केला गेला. (latest marathi news)

Water Shortage
Nashik Water Shortage : पिंपळगाव (वा) ला 29 वर्षानंतर टॅंकर; 5 दिवसाआड पाणी

शहरासाठी पाण्याचे आरक्षण (दशलक्ष घनफुटात)

- गंगापूर धरण- ३८०७

- दारणा व मुकणे धरण- १५०७

- एकूण आरक्षण- ५३१४

पाण्याचा वापर (दशलक्ष घनफूट)

- १५ ते ३१ ऑक्टोंबर- ३३४.६५

- १ ते ३० नोव्हेंबर- ५९३.६७

- १ ते ३१ डिसेंबर- ५९५

- १ ते ३१ जानेवारी- ६११.२७

- १ ते २९ फेब्रुवारी - ५७८.९८

- १ ते ३१ मार्च - ६०२.११

- १ एप्रिल ते ३० एप्रिल- ५९५.१४

- १ मे ते दोन मे- ५७०.६८

एकूण वापर- ४४८१.५०

Water Shortage
Nashik Water Shortage : जिल्ह्यात 6 लाख नागरिकांची भागतेय टँकरच्या पाण्यावर तहान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com