

नाशिक : पाणीपुरवठा विभागासह स्मार्ट सिटी कंपनी मार्फत जलशुद्धीकरण केंद्रे, बुस्टर पंपिंग स्टेशन येथे जलकुंभांवर फ्लोमीटर्स, व्हॉल्व्स बसविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे शनिवारी (ता. ३०) संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. रविवारी (ता. १) कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.