Nashik Water Scarcity : जिल्ह्यात 785 गाव-वाड्यांना 260 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

Nashik News : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. २४२ गावे व ५४० वाड्यांवर २६० टँकरच्या ५७० फेऱ्यांद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे.
Water Tanker (file photo)
Water Tanker (file photo)esakal

Nashik News : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. २४२ गावे व ५४० वाड्यांवर २६० टँकरच्या ५७० फेऱ्यांद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील धरणांची पातळी खालावत चालली. त्यामुळे टँकरची संख्या वाढत असून, टंचाईचे संकट गडद होत आहे. जिल्ह्यात यंदा कमी प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे धरणे, छोट्या-मोठ्या तलावांमध्ये पुरेसा साठा झालेला नाही. (Nashik Water Scarcity)

तसेच, दिवसेंदिवस कडक उन्हाळा जाणवत असल्याने भूगर्भातील पाणीपातळीही खालावत चालली आहे. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला. काही गावांना गत वर्षभरापासून टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढू लागल्याने टॅंकरची संख्या वाढत आहे.

सद्यःस्थितीत २४२ गावे आणि ५४० वाड्या अशा ७८५ ठिकाणी २६० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वाधिक ६४ टँकर नांदगाव तालुक्यात, तर ४५ टँकर येवला तालुक्यात तहान भागविण्याचे काम करीत आहेत. (Latest Marathi News)

Water Tanker (file photo)
Nashik Traffic Problem : मखमलाबाद नाक्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच; शहर वाहतूक शाखेचे दुर्लक्ष

बागलाण (३२), चांदवड (३१), देवळा (३०), इगतपुरी (१), मालेगाव (३६), सिन्नर (१७), सुरगाणा (२), तर नाशिक तालुक्यात एक टॅंकर सुरू आहे. दुष्काळग्रस्त असलेल्या १२ गावांना तसेच १०३ ठिकाणी टँकरसाठी ११६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

यात बागलाण (३७), चांदवड (५), देवळा (३०), मालेगाव (३१), नांदगाव (४), सुरगाणा (२), येवला तालुक्यासाठी (७) विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.

Water Tanker (file photo)
Nashik Manohar Karda Case : अशोक कटारिया उपनगर पोलिसांसमोर 'हजर'! कारडा आत्महत्या प्रकरणी भारती कारडा यांचा जबाब

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com