
नाशिक : गंगापूर, मुकणे धरणांवरील पंपिंग स्टेशनवर महापालिकेच्या यांत्रिकी विभागातर्फे विद्युतविषयक कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित राहणार असल्याने शनिवारी (ता. १) दिवसभर संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहील. रविवारी (ता. २) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने राहणार आहे. गंगापूर धरणावर महापालिकेच्या पंपिंग स्टेशनकरिता ‘महावितरण’च्या १३२ केव्ही सातपूर व महिंद्र या दोन फिडरवरून ३३ केव्ही उच्च दाबाचा वीजपुरवठा होतो.