SAKAL Impact : लासलगावला आजपासून पाणीपुरवठा! बंदच्या इशाऱ्यानंतर यंत्रणा हलली, वालदेवी, मुकणेतून लासलगावला पाणी

Nashik News : लासलगाव सह लाभार्थी गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नांदूर मध्यमेशवर धरण कोरडे ठाक पडल्याने भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते.
Sakal Impact
Sakal Impactesakal

लासलगाव : गेल्या अनेक दिवसापासून लासलगाव सह लाभार्थी गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नांदूर मध्यमेशवर धरण कोरडे ठाक पडल्याने भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. नागरिकांच्या रेट्यामुळे उद्या शनिवारी (ता.११) पहाट पासून सुरळीत पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती लासलगाव ग्रामपंचायत ग्रामसेवक लिंगराज जंगम यांनी दिली. (Water supply to Lasalgaon start from today)

जलवाहिनीची गळती, नादुरुस्त मोटार, वीज पुरवठा खंडित व धरणाने गाठलेला तळ या विविध समस्यांमुळे लासलगावकरांना २० ते २२ दिवसापासून नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते.

नागरिकांनी लोकसभा मतदान बहिष्कार व लासलगाव बंदचा इशारा दिल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने तत्काळ उपयोजना करून वालदेवी मुकणे व दारणा धरणातून पाणी सोडून लासलगावला पाणीपुरवठा करणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर धरणात पाणी सोडले. (latest marathi news)

Sakal Impact
Nashik News : वकिलांच्या रक्षणाचा मुद्दा लोकसभेत मांडू : डॉ. सुभाष भामरे

पाणवेलीचा अडसर

मात्र पाणी नांदूर मध्यमेश्वर धरणात पोहोचल्यानंतर जॅकवेल पर्यंत पाणी पुढे येत नव्हते लासलगाव ग्रामपंचायतीने कर्मचाऱ्यांच्या मदतीने जेसीबी लावून पानवेली काढून जॅकवेल पर्यंत पाण्याचा मार्ग मोकळा केला.

आज शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत पाण्याच्या टाक्या भरून शनिवारी पहाट पासून लासलगावकरांना पाणी वितरित केले जाईल.पाणवेलीमुळे पाणी नागरिकांनी व्यवस्थित गाळून घेऊन त्याचा वापर करावा.

Sakal Impact
Nashik NMC News : बंदोबस्तात धोकादायक इमारती, वाडे उतरविणार; महापालिका आयुक्तांच्या सूचना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com