Nashik News : येवल्यात पंधराव्या महिन्यात पाणीटॅंकर सुरुच! मुसळधार पावसाची प्रतीक्षा

Nashik News : मुसळधार पाऊस नसल्याने सलग पंधराव्या महिन्यात तालुक्यातील ६१ गावे अन् ६० वाड्यांना पाणीटँकर सुरूच आहे.
Repair of electric pump for filling tanker
Repair of electric pump for filling tankeresakal

येवला : यंदाचा पावसाळा सुरू झाला तरी अद्यापही गावोगावी टँकरने पाणीपुरवठा सुरूच आहे. पावसाचे आगमन झाले खरे. मात्र, मुसळधार पाऊस नसल्याने सलग पंधराव्या महिन्यात तालुक्यातील ६१ गावे अन् ६० वाड्यांना पाणीटँकर सुरूच आहे. टंचाईतून मुक्ततेसाठी आता मुसळधार पावसाची प्रतीक्षा येवलेकरांना आहे. ब्रिटिशकालीन दुष्काळी असलेल्या येवल्यात उन्हाळ्यातील पाणीटंचाई पाचवीला पुजलेली आहे. (Water tanker continues in yeola)

दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये टँकरची मागणी सुरू होते आणि जूनपर्यंत टॅंकर चालतात, हा वर्षानुवर्षाचा इतिहास आहे. विशेषत: उत्तर-पूर्व भागात तर पाणीटंचाई सर्वाधिक असते. त्यातच ३८ गाव पाणीपुरवठा योजनेमुळे काही गावे टँकरमुक्त झाल्याने टँकरग्रस्तांची संख्या अल्पशी घटली असली तरी टंचाईची तीव्रता मात्र वाढतच आहे.

पावसाचे प्रमाण बेभरोशाचे झाल्याने उत्तर-पूर्व भागात टंचाईग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यातच पावसाचे प्रमाण घटत चालल्याने भूगर्भातील जमिनीची पातळी खालावत आहे. परिणामी, शेतकरी व गावोचे जलस्त्रोत कोरडे होऊन टंचाई अधिक निर्माण होत आहे. मागील वर्षी मार्चपासूनच तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाली होती.

प्रशासनाने मंजुरीला दिरंगाई केल्याने मार्चमध्ये आलेले प्रस्ताव एप्रिलमध्ये मंजूर झाले होते. मागीलवर्षी १७ एप्रिलला तालुक्यातील आहेरवाडी, जायदरे, रेंडाळे, चांदगाव, ममदापूर, खरवंडी, देवदरी, वसंतनगर, अनकाई, गोरखनगर आदी ठिकाणी टँकर सुरू झाले होते. त्यानंतर ही संख्या आज मितीला ६१ गावे आणि ६० वाड्यांवर पोहोचली असून, रोज ६० टँकरद्वारे १२२ खेपातून पाणीपुरवठा केला जात आहे. (latest marathi news)

Repair of electric pump for filling tanker
Nashik Gangapur Dam : ‘गंगापूर’मधून पाणी लिफ्ट करण्याचा निर्णय! आचारसंहितेमुळे धरणात चर खोदाईला ब्रेक

यासाठी दिवसाला अडिच ते तीन लाखाचा चुराडा प्रशासनाला करावा लागत आहे. शहराच्या साठवण तलावालगत नांदूर, धुत, पटेल, प्रज्वल पटेल, सुनील जाधव, पैठणकर, थळकर विहीर या सहा विहिरीतून रोज १२२ टँकर भरले जात आहेत. पूर्व भागात सर्व जलस्त्रोत कोरडे असल्याने अद्यापही महिनाभरापर्यंत टँकर सुरू राहतील, असा अंदाज आहे.

तालुक्याच्या चारही भागात २० ते ३० किलोमीटरपर्यंत टँकर पाठवावे लागत असल्याने १२२ खेपांसाठी रोज १५७६ किलोमीटरचा प्रवास टँकरला करावा लागत असून, सुमारे लाखभर नागरिकांची तहान यावर भागविली जात आहे.

प्यायला पाणीच नाही!

मृग नक्षत्राच्या सोबत पावसाचे आगमन झाल्याने तालुक्यात खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. हलक्या स्वरूपाचे दोन ते तीन पाऊस सर्वत्र झाल्याने पेरण्याना गती मिळाली असून, सर्वत्र हिरवेगार वातावरण दिसत आहे. हवामानातील उष्णताही कमी होऊन आल्हादायक वातावरण तयार झाले असले तरी जलस्त्रोत कोरडे असल्याने पिण्याच्या पाण्यासाठीची ग्रामीण भागातली भटकंती मात्र थांबलेली नाही.

Repair of electric pump for filling tanker
Nashik News : उद्योग वाढीत मनुष्य विकास व्यवस्थापकांचे कार्य महत्त्वाचे : कथरीना कोलकिंग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com