Nashik West Assembly Constituency: भाजपच्या बालेकिल्ल्याला वडाळा, पाथर्डीचे हादरे; गावातील पाचही बूथवर वाजे आघाडीवर

Assembly Constituency : नासर्डी ते पाथर्डी भागाने ५० बुथवर सुमारे ६ हजार १४८ मतांची आघाडी देत हा परिसर भाजपचा बालेकिल्ला असल्याचे अधोरेखित केले आहे.
celebration in Pathardi area
celebration in Pathardi areaesakal

Nashik West Assembly Constituency : लोकसभा निवडणुकीत नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे हेमंत गोडसे यांना मिळालेल्या ३१ हजार २१० मतांच्या आघाडीत नासर्डी ते पाथर्डी भागाने ५० बुथवर सुमारे ६ हजार १४८ मतांची आघाडी देत हा परिसर भाजपचा बालेकिल्ला असल्याचे अधोरेखित केले आहे. अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेदेखील मोठे योगदान आहे. (Vaje is leading at all five booths in village in pathardi )

दुसरीकडे याच भागातील नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या इंदिरानगर भागातील २३ बूथवर गोडसे यांना मिळालेल्या २ हजार ९१० मतांच्या आघाडीला वडाळा गावातील अवघे बारा बूथ भारी पडले असून, येथून महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजे यांना सुमारे ३ हजार ७४५ मतांची दणदणीत आघाडी दिली आहे. विशेष म्हणजे नाशिक मध्य मतदारसंघातून वाजे यांना ३ हजार ८०६ मतांची आघाडी आहे.

तर पाथर्डी गावातील पाचही बूथवर वाजे आघाडीवर असून गोडसे यांना ११६५, तर वाजे यांना १५१९ अशी मते टाकत पाथर्डी ग्रामस्थांनी येथे ठाकरेंची शिवसेनाच भारी असल्याचे स्पष्ट केले आहे. नाशिक पश्चिमच्या ५० बूथवर गोडसे यांना सुमारे १८ हजार ६४, तर वाजे यांना सुमारे ११ हजार ९१६ मते मिळाली आहेत.

यात प्रामुख्याने महायुती आणि आघाडी या क्रमाने डे केअर सेंटर शाळेतील केंद्रात (४२०१ आणि ३४१९), केंब्रिज शाळा (२४३२ आणि १५४०), सेंट फ्रान्सिस शाळा (१३५९ आणि ८५९), शारदा शाळा (२८०९ आणि १५०६), गुरुगोविंदसिंग शाळा (१६९५ आणि ८४२), धनलक्ष्मी शाळा (१०३५ आणि ८१५), पोद्दार शाळा (११९२ आणि ७७५), स्ट्रॉबेरी स्कूल (१२२६ आणि ८६२), आर. के. फिटनेस (८०९ आणि ५४१) यासह प्रशांतनगर आणि पाथर्डी भागातील बूथचा समावेश आहे. पैकी डे केअर शाळेतील २ व रायगड उद्यम सोसायटी येथील एक अशा तीन बुथवर वाजे यांना अवघ्या २९५ मतांची आघाडी मिळाली आहे. (latest marathi news)

celebration in Pathardi area
Nawapur Assembly Constituency : काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला पुन्हा सिद्ध

आमदार सीमा हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील भाजपचे माजी नगरसेवक सतीश सोनवणे, ॲड. श्याम बडोदे, सुनील खोडे, डॉ. दीपाली कुलकर्णी, सुप्रिया खोडे, पुष्पा आव्हाड, भगवान दोंदे, संजय नवले, डॉ. पुष्पा पाटील (नवले), एकनाथ नवले, राम बडगुजर, जितेंद्र चोरडिया, गणेश ठाकूर आदी, तर शिंदे गटाचे माजी नगरसेवक सुदाम डेमसे, अमोल जाधव, संगीता जाधव हे स्वतःची बूथ यंत्रणा वापरून ही आघाडी मिळवून देण्यात यशस्वी ठरले, तर आघाडीतर्फे ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख देवानंद बिरारी, उपमहानगरप्रमुख नीलेश साळुंखे, विभागप्रमुख विनोद दळवी, ऋषिकेश वर्मा, संजय गायकर, सागर देशमुख आदी काही प्रमाणात मते खेचून आणण्यात यशस्वी ठरले.

एकमेव बूथवर आघाडी

मध्य विधानसभा मतदारसंघातील इंदिरानगर, सुचितानगर, विनयनगर, दिपालीनगर, परबनगर या भागातील २३ बुथवर गोडसे यांना ९ हजार १४४, तर वाजे यांना ६ हजार २३४ मते मिळाली. सुखदेव शाळेतील तीन, सावरकर हॉल, स्टेट बँक कॉलनी आणि स्वामी विवेकानंद शाळेतील प्रत्येकी एक बूथ मिळून वाजे यांना ५९० मतांची फक्त आघाडी मिळाली आहे.

दुसरीकडे वडाळा गाव आणि आसपासच्या वसाहती तसेच अल्पसंख्याक समाजाचे मतदार असलेल्या १२ बूथवर वाजे यांना ५ हजार ९६३ मते मिळाली असून, गोडसे यांना अवघी १ हजार ९७३ मते मिळाली आहेत. येथील इंदिरानगरच्या मतदारांचा समावेश असलेल्या एकमेव बूथवर गोडसे ११६ मतांनी आघाडीवर आहेत.

celebration in Pathardi area
Amalner Assembly Constituency : एकीचे बळ... कार्यकर्त्यांची साथ... सहानुभूतीची लाट

भाजपसाठी आव्हान

भाजपचे माजी महापौर सतीश कुलकर्णी, माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे, सुनील खोडे, ज्येष्ठ नेते विजय साने, अजिंक्य साने, यशवंत निकुळे, शाहीन मिर्झा यांनी आमदार देवयानी फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे युतीसाठी मेहनत घेतली तर आघाडीतर्फे माजी आमदार वसंत गिते, प्रवीण जाधव, आकाश खोडे, प्रकाश खोडे, ऋषिकेश वर्मा, सरप्रितसिंग बल, रमिझ पठाण आदींनी येथे जोर

लावला. पाथर्डी गाव परिसरात मात्र ठाकरे गटाचे बाळकृष्ण शिरसाट, त्र्यंबक कोंबडे, मदन डेमसे, रवींद्र गामणे, सुनील कोथमिरे, धनंजय गवळी, दीपक केदार, संदेश एकमोडे, दादा मेढे आदींनी वाजे यांना आघाडी मिळवून देत लक्ष वेधून घेतले. वडाळा आणि पाथर्डीच्या या नव्या पॅटर्नने मात्र आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत भाजपसाठी आव्हान उभे करण्याचे स्पष्ट संकेत यानिमित्ताने दिले आहेत हे नक्की.

celebration in Pathardi area
Nashik Assembly Constituency : मध्य विधानसभा मतदारसंघात धोक्याची घंटा! महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com