कुठे महापुराच्या लाटा, कुठे घसा कोरडा
कुठे महापुराच्या लाटा, कुठे घसा कोरडाsakal

नाशिक : कुठे महापुराच्या लाटा, कुठे घसा कोरडा

जिल्ह्यात १०६ टक्के पाऊस, सहा तालुक्यात सरासरीला ब्रेक

येवला : चालू वर्षाच्या पावसाने काय दिले असे विचारले तर महापूर अन अब्जावधीचे नुकसान असेच उत्तर मिळते. एकीकडे जिल्ह्याची सरासरी ओलांडून १०६ टक्के पाऊस झाला असला तरी जिल्ह्यातील नाशिक, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, चांदवड, कळवण, सिन्नर या तालुक्यात मात्र वार्षिक पर्जन्यमानाची वार्षिक सरासरी देखील पावसाने गाठलेली नाही. त्यामुळे कुठे महापूर तर कुणाला कोरडा ठेवून यंदाचा पावसाळा संपला आहे. जूनच्या सुरुवातीला मुसळधार झालेल्या पावसाने नंतर मात्र आपले रूप नेहमीप्रमाणे दाखवत दडी मारल्याने यावेळेस पेरण्या खोळंबल्या. जुलै-ऑगस्टमध्ये देखील या पावसाने दडी मारल्याने पिकांचे नुकसान झाले. या दोन महिन्यात तर पाऊस खरिपाची वाट लावतो की काय अशी शक्यता निर्माण झाली होती.

जूनची जिल्ह्यात केवळ सरासरी १७१ मिमी (१७ टक्के )पाऊस पडला होता. सप्टेंबरच्या पावसाने मात्र सर्वत्र दाणादाण करत नवे रेकॉर्ड तयार केले. ऑक्टोबरमध्ये मध्यम पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्याची वार्षिक पर्जन्याची टक्केवारी १०६ टक्क्यावर पोहोचली. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमानची सरासरी ९२३ मिलिमीटर असताना १ हजार १३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. १६-१ नुकसानीचे नवे विक्रम.

 कुठे महापुराच्या लाटा, कुठे घसा कोरडा
नवीन लाल कांद्याची आवक वाढेपर्यंत उन्हाळ कांदा खाणार ‘भाव''

ऑगस्ट व सप्टेंबरच्या पावसाने शेतकऱ्यांना नको नको म्हणायची वेळ आणली. नांदगाव, येवल्यात तर पूर येऊन कोट्यवधीचे नुकसान या पावसाने केले. धोधो पाऊस पडल्याने शेतातील काढणीला आलेल्या पिकांचे कोट्यवधीचे नुकसान होऊन हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावला गेला. या काळात जिल्ह्यात पिकांच्या तब्बल १२० कोटी रुपयांच्या नुकसानीचे पंचनामे केले गेले असून इतर नुकसानही कोट्यवधींच्या घरात होते. १६-१ माहेरघरीच पाणीबाणी! इगतपुरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचे माहेरघर असून येथे धो-धो पाऊस ठरलेला असतो.

मात्र मागील वर्षीप्रमाणे यंदाही पावसाने या भागावरच वक्रदृष्टी केली असून दुष्काळी तालुक्यात मात्र महापूर आले. तर पावसाळा संपल्यावर नाशिकला ६०,दिंडोरीत ९१,त्रंबकेश्वर ८९,चांदवड ६२,कळवण ९२ तर सिन्नरला ८८ मिमी पाऊस झाला असून सरासरीची शंभरी सुद्धा गाठलेली नाही.याउलट दुष्काळी मालेगावमध्ये १२९,इगतपुरीत ११०,पेठला ११९,नांदगांवला सर्वाधिक १७९,येवला १२८,देवळात ११०,निफाड ११७,सुरगाणा १२० टक्के पाऊस नोंदला आहे.यामुळे दुष्काळी तालुक्यात यंदा रब्बी जोमाने फुलणार आहे. १६-१ दोन वर्षापेक्षा कमीच पाऊस... २०१९ मध्ये नाशिक, इगतपुरी, दिंडोरी, पेठ, त्र्यंबक, सुरगाणा या भागात धोधो पाऊस पडल्याने नद्या-नाल्यांना पूर आलेच पण जिल्ह्यातील पर्जन्याचे आकडेही फुगले होते.

 कुठे महापुराच्या लाटा, कुठे घसा कोरडा
नवीन लाल कांद्याची आवक वाढेपर्यंत उन्हाळ कांदा खाणार ‘भाव''

तर देवळा (८७ टक्के) वगळता सर्व तालुक्यांनी सरासरीची शंभरी ओलांडली होती. त्यामुळे तब्बल १५७ टक्के (सरासरी -१६७० मिमी) पाऊस पडला होता. तर २०२० ला पावसाच्या माहेरघरी प्रमाण कमी असल्याने १०८ टक्के (११४८ मिमी) पाऊस पडला होता. मागील दोन वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण दोन कमी असून १०६ टक्के (११३२ मिमी) पाऊस नोंदला गेला आहे. १६-१ धरणे ९५ टक्के भरलेले! खूप पाऊस दिसत असला तरी धरणांच्या लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण नगण्य असल्याने यंदा पूर फारसे दिसले नाही. यामुळे जिल्ह्यातील धरणाचा आजचा पाणीसाठा ६२ हजार ३८९ दलघफू (९५ टक्के) आहे. जिल्ह्यातील मोठ्या ७ व मध्यम १७ या एकूण २४ पैकी १४ धरणांचा साठा १०० टक्के इतर धरणात ९९ टक्क्यापर्यत पाणी आहे. मागील वर्षीही ९५ टक्केच पाणीसाठा होता. पुरेसासाठा असल्याने रब्बीसाठी मुबलक आवर्तने मिळू शकतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com