
लखमापूर : पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिक आता सीएनजी वाहनांकडे वळू लागले आहेत. सीएनजी स्वस्त असल्याने अनेकजण आपल्या जुन्या वाहनांमध्ये सीएनजी किट बसवू लागले आहेत. नागरिकांचा सीएनजीकडे कल वाढू लागला असताना जिल्ह्यात सीएनजी पंपांची संख्या मात्र अत्यल्प आहे. जिल्ह्यातील दिंडोरी, निफाड, सिन्नर या तालुक्यांमध्ये सध्या सीएनजीचे पंप सुरू आहेत. वाहनांच्या तुलनेत ही संख्या अपुरी असल्याने शहरी व ग्रामीण भागातील वाहनधारकांना वाहनांमध्ये सीएनजी भरताना दमछाक होत आहे.