Nashik News : मालेगावी प्लास्टिक बंदी नावालाच! सर्वत्र प्लास्टिकचा सर्रास वापर

Nashik : शहरात प्लास्टिक पिशवीचा सर्रास वापर होत आहे. प्लास्टिक पिशव्यांमुळे शहरातील गटार तुडूंब भरलेल्या आहेत.
Plastic waste dumped on the open ground near the road of Salamcha here
Plastic waste dumped on the open ground near the road of Salamcha hereesakal

Nashik News : शहरात प्लास्टिक पिशवीचा सर्रास वापर होत आहे. प्लास्टिक पिशव्यांमुळे शहरातील गटार तुडूंब भरलेल्या आहेत. येथील ओवाडी नाल्याजवळ प्लॅस्टिक कारखान्यांमुळे प्लास्टिक कचरा नाल्यात जात असताना नालाही भरला आहे. शहरात सर्रासपणे प्लास्टिक पिशवीचा वापर होतो. कारवाई फक्त नावापुरतीच होते, परिस्थिती पुन्हा जैसे थे होते. शहरातील प्लास्टिक विक्रीवर लगाम लागावा यासाठी महापालिकेने जनजागृती करावी अशी मागणी होत आहे. (Widespread use of plastic everywhere in malegaon )

शहरात प्लास्टिक पिशवीने अनेक गटारी तुडूंब भरल्या आहेत. येथील जुन्या आग्रा रस्त्यावरील ओवाडी नाल्याजवळ प्लास्टिक गोडाऊन असल्याने सर्व प्लास्टिक कचरा नाल्यात पडतो. शहरात कचराकुंडी नसल्याने नागरिकही कचरा रस्त्यावर व मुख्य चौकात टाकतात. वेळेत घंटागाडी येत नसल्याने तो कचरा गटारीत पडतो. त्यामुळे गटारी तुडूंब भरलेल्या असतात. पूर्व भागात प्लास्टिकचा सर्रासपणे वापर होतो.

येथील रोज भरणाऱ्या बाजारात किरकोळ वस्तूंसाठी प्लॅस्टिक वापरतात. शहरात प्लास्टिक बंदी नावालाच आहे का असा कुणालाही प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. या कचऱ्यामुळे शेळ्या, गायी प्लास्टिक खातात, त्यामुळे अनेक गायींना मृत्यूही झालेला आहे. प्लास्टिक खाण्यात शेळ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात रोज एक-दोन शेळ्या येतात. (latest marathi news)

Plastic waste dumped on the open ground near the road of Salamcha here
Nashik News : नाशिक शहरातील 155 मांस विक्रेत्यावर कारवाई! भरारी पथकांच्या माध्यमातून तपासणी मोहीम

प्लॅस्टिकमुळे अनेक शेळ्या मृत्युमुखी पडतात. शेळी मालक नाइलाजाने शेळ्यांना विक्री करतो. येथील इक्बाल डाबी, मच्छी बाजार, महात्मा फुले भाजी मार्केट, आझादनगर, डेपो रोड, रौनकाबाद, सोमवार बाजार, आयशानगर, गोल्डननगर, नुमानी नगर, सुलेमानी मशीद, साठ फुटी रोड यासह विविध भागात रोज बाजार भरतो. येथे प्लास्टिक पिशवीचा सर्रासपणे होणारा वापर कधी थांबणार असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे.

''प्लास्टिक पिशवी खाऊन रोज एक-दोन शेळ्या उपचारासाठी दवाखान्यात येत असतात. शेळ्यांबरोबरच गायींचे प्रमाणही आहे. शेळ्या व गायींच्या मृत्युचा धोका निर्माण होत असल्याने, शेळ्या व गायी मालकांना नाईलाजोत्सव जनावरे विकावे लागतात.''- डॉ. जावीद खाटीक, पशुधन विकास अधिकारी, मालेगाव

''प्लास्टिक उत्पादन करणाऱ्यांवर कारवाई करावी. कारवाई तात्पुरती न करता सतत पाठपुरावा करावा. शहरातून प्लास्टिक पिशवी हद्दपार झाली पाहिजे. महापालिकेने कडक कारवाई करावी, जेणे करुण प्राण्यांच्या जिवास धोका कमी होईल. शहरात प्लास्टिक पिशवीवर बंदी काही काळ होते. पुन्हा परिस्थिती जैसे थे होते.''- रामदास बोरसे, अध्यक्ष, सार्वजनिक नागरी सुविधा समिती, मालेगाव.

Plastic waste dumped on the open ground near the road of Salamcha here
Nashik News : खिरमाणी फाट्यावर 'द बर्निग' बसचा थरार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com